
Sunrise Efficient Share Price | सनराइज एफिशिएंट मार्केटिंग लिमिटेड कंपनीच्या शेअरने मागील 1 वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 160 टक्के परतावा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 310 रुपये होती. तर नीचांक पातळी किंमत 87 रुपये होती. सनराइज एफिशिएंट मार्केटिंग लिमिटेड कंपनीचे एकूण बाजार भांडवल 109 कोटी रुपये आहे.
सनराइज एफिशियंट मार्केटिंग लिमिटेड कंपनीच्या शेअरचा PE प्रमाण 13.54 अंकावर आहे. 19 ऑगस्ट 2023 रोजी सनराईज एफिशियंट कंपनीचे शेअर्स 88 रुपये या आपल्या नीचांक किमतीवर ट्रेड करत होते. तर आज बुधवार दिनांक 23 ऑगस्ट 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.96 टक्के वाढीसह 220.60 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
सनराईज एफिशियंट ही कंपनी मुख्यतः ऑटोमोटिव्ह, ड्राइव्ह, गियर बॉक्स, मोटर, पंप, तेल आणि FMCG उत्पादने आणि वितरण संबंधित व्यवसाय करते. नुकताच या कंपनीने आपल्या शेअर धारकांना 1 : 1 या प्रमाणात मोफत बोनस शेअर वाटप करण्याची घोषणा केली आहे. कंपनीने गुंतवणूकदारांची पात्रता निश्चित करण्यासाठी 9 सप्टेंबर 2023 हा दिवस रेकॉर्ड तारीख म्हणून निश्चित केला आहे.
जून 2023 तिमाहीत सनराईज एफिशिएंट मार्केटिंग लिमिटेड कंपनीने 77 टक्क्यांच्या वाढीसह 61 कोटी रुपये विक्री नोंदवली आहे. जून तिमाहीत कंपनीने 281 टक्क्यांच्या वाढीसह 7 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. या कंपनीने आपल्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्याची योजना आखली आहे. यासह कंपनी आपल्या उत्पादन श्रेणीमध्ये नवनवीन वस्तूंचा समावेश करत आहे.
सनराईज एफिशियंट कंपनीने दिलेल्या माहिती आपले मुख्य उद्दिष्ट जाहीर केले आहेत. त्यात कंपनीने म्हंटले आहे की, आपल्या ग्राहकांना उच्च दर्जाचे आणि ऊर्जा कार्यक्षम उत्पादने तसेच ऑटोमेशन सोल्यूशन्स प्रदान करणे, हे कंपनीचे सर्वप्रथम उद्देश्य आहे. सोमवारच्या ट्रेडिंग सेशन मध्ये सनराईज एफिशियंट कंपनीच्या शेअर्समध्ये विक्रीचा दबाव पाहायला मिळाला होता.
शेअरची किंमत 218 रुपयेवर आली होती. शेअर बाजारातील तज्ज्ञांच्या मात्र सनराइज एफिशिएंट मार्केटिंग लिमिटेड कंपनीच्या स्टॉक PE मध्ये अधिक सुधारणा होणे अपेक्षित आहे. मागील 1 वर्षात सनराइज एफिशिएंट मार्केटिंग लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 160 टक्के नफा कमावून दिला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.