
Surani Steel Tubes Share Price | ‘टाटा स्टील’ सारख्या दिग्गज स्टील कंपनीचे शेअर्स घसरत आहेत, तर दुसरीकडे ‘सुरानी स्टील ट्युब्स’ सारख्या स्मॉल कॅप स्टील कंपनीचे शेअर्स गगनभरारी घेत आहेत. ‘सुरानी स्टील ट्युब्स’ या कंपनीच्या शेअरने मागील एका महिन्यात आपल्या शेअर धारकांना 164 टक्क्यांहून अधिक परतावा कमावून दिला आहे.
तर मागील एका महिन्यात टाटा स्टील कंपनीचे शेअर्स 0.84 टक्के घसरले आहेत. आज शुक्रवार दिनांक 12 मे 2023 रोजी टाटा स्टील कंपनीचे शेअर्स 1.70 टक्के घसरणीसह 106.70 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. तर ‘सुरानी स्टील ट्युब्स’ कंपनीचे शेअर्स 190 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. टाटा स्टील कंपनीचे बाजार भांडवल 1.33 लाख कोटी रुपये आहे. ‘सुरानी स्टील ट्युब्स’ कंपनीचे बाजार भांडवल 14,265 कोटी रुपये आहे.
टाटा स्टील कंपनीने मागील पाच दिवसात आपल्या गुंतवणुकदारांना 2.07 टक्के नकारात्मक परतावा दिला आहे. ‘सुरानी स्टील ट्युब्स’ कंपनीने लोकांना 27 टक्क्यांहून अधिक बंपर परतावा कमावून दिला आहे. सुराणी स्टील कंपनीने मागील एका महिन्यात आपल्या गुंतवणूकदारांना 164.33 टक्के परतावा कमावून दिला आहे.
मागील 3 महिन्यांच्या काळात परतावा देण्याबाबत सुराणी स्टील कंपनीच्या शेअर्सनी टाटा स्टील कंपनीला खूप मागे टाकले आहे. मागील तीन महिन्यांत टाटा स्टील कंपनीचे शेअर्स फक्त 0.18 टक्क्यांनी वाढले आहेत. सुरानी स्टील कंपनीचे शेअर्स 431 टक्क्यांनी वाढले आहेत.
‘सुरानी स्टील ट्युब्स’ कंपनीच्या शेअरने अवघ्या एका वर्षात लोकांना एक लाखावर 4 लाख परतावा दिला आहे. तर टाटा स्टील कंपनीने एक लाखाचे 94000 केले आहे. मागील एका वर्षात सुरानी स्टील ट्यूब्स कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे.
मागील एका वर्षात टाटा स्टील कंपनीच्या शेअर ने आपल्या गुंतवणुकदारांना 4.54 टक्के नकारात्मक परतावा दिला आहे. तर ‘सुरानी स्टील ट्युब्स’ कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 303 टक्के परतावा दिला आहे. ‘सुरानी स्टील ट्युब्स’ कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 19 रुपये होती. तर उच्चांक पातळी किंमत 180.80 रुपये आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.