Suryalata Spinning Mills Share Price | 25 दिवसात 100% परतावा! हा शेअर रोज अप्पर सर्किट हीट करतोय, स्टॉक खरेदी करणार का?

Suryalata Spinning Mills Share Price | वस्त्रोद्योग क्षेत्रातील ‘सूर्यलता स्पिनिंग मिल्स’ कंपनीच्या शेअरने मागील 20-25 दिवसांत आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 100 टक्के वाढवले आहेत. मागील एक महिन्यापासून या कंपनीचे शेअर्स सतत अप्पर सर्किट हीट करत आहेत. सोमवार दिनांक 20 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.99 टक्के वाढीसह 631.95 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. सेबीने शेअर्समधील भाववाढीबाबत कंपनीकडून स्पष्टीकरण मागवले होते. (Suryalata Spinning Mills Limited)
सूर्यलता स्पिनिंग मिल्स शेअरची कामगिरी :
‘सूर्यलता स्पिनिंग मिल्स’ कंपनीच्या शेअरने मागील एका महिन्यात आपल्या गुंतवणुकदारांना 70.43 टक्के परतावा कमावून दिला आहे. 20 फेब्रुवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 314.90 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 16 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 632.80 रुपये किमतीवर पोहचले आहेत. अशा प्रकारे अवघ्या 25 दिवसांत गुंतवणूकदारांनी 101 टक्के नफा कमावला आहे. ज्या लोकांनी 25 दिवसांपूर्वी या स्टॉकवर 1 लाख रुपये लावले होते, त्यांचे पैसे आता दुप्पट झाले आहेत. मागील पाच वर्षांत या कंपनीच्या शेअरने लोकांना 358.10 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात 84.30 टक्के, तर 2023 या वर्षात 95 टक्के परतावा मिळवून दिला आहे. गेल्या 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअरची किंमत 92.49 टक्के वाढली आहे.
सेबीने मागवले उत्तर :
‘सूर्यलता स्पिनिंग मिल्स’ कंपनीच्या शेअर्समध्ये अचानक झालेली वाढ पाहता, स्टॉक एक्सचेंज नियामक सेबीने गुंतवणूकदारांचे हित जपण्याच्या उद्देशाने ‘सूर्यलता स्पिनिंग मिल्स’ कंपनीच्या व्यवस्थापन मंडळाकडून सविस्तर माहिती मागवली होती. 23 फेब्रुवारी 2023 रोजी सेबीने कंपनीकडून उत्तर मागवले होते, तर 24 फेब्रुवारी 2023 रोजी कंपनीने सेबीला उत्तर सादर केले.
आपल्या स्पष्टीकरणात, कंपनीने कळवले आहे की, 23 जानेवारी 2023 रोजी ‘सूर्यलता स्पिनिंग मिल्स’ कंपनीने ‘सनट्री सोलर एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड’ कंपनीचे अधिग्रहण केले आहे. आणि त्याच्याशी संबंधित सर्व माहिती स्टॉक एक्सचेंजला कळवण्यात आली आहे. या संपादनाशिवाय कंपनीने अन्य कोणताही आर्थिक व्यवहार केला नाही, अशी माहिती कंपनीने सेबीला कळवली आहे.
कंपनीने आपल्या उत्तरात म्हंटले आहे की, जोपर्यंत शेअरमधील किमतीच्या हालचालींचा संबंध आहे, तो पूर्णपणे बाजारातील परिस्थिती आणि बाजारातील गुंतवणूकदारांच्या प्रतिसादवर अवलंबून आहे. कंपनीचे शेअरच्या किमतीवर किंवा ट्रेडिंगवर कोणतेही नियंत्रण नाही. या व्यतिरिक्त, कंपनीकडे अशी कोणतीही माहिती, कार्यक्रम किंवा घोषणा उपलब्ध नाही ज्यामुळे कंपनीचे उसळी घेतील. आणि कंपनी सेबीने ठरवून दिलेल्या सर्व नियमांचे पालन करत आहे.
स्टॉकमध्ये सतत सर्किट :
मागील 10 दिवसांत सूर्यलता स्पिनिंग मिल्स लिमिटेड कंपनीच्या शेअरमध्ये सतत अप्पर सर्किट लागत आहे. 10 मार्च रोजी 2023 रोजी या कंपनीच्या शेअरने 703.25 रुपये किंमत स्पर्श केली होती. 13 मार्च आणि 14 मार्चला स्टॉकमध्ये अप्पर सर्किट्स लागला होता. यानंतर 15, 16 आणि 17 मार्चला सलग तीन दिवस शेअरमध्ये लोअर सर्किट लागला. 14 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 774.95 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किमतीवर पोहचले होते. तर 23 डिसेंबर 2023 रोजी हा स्टॉक 272.4 या नीचांक किमतीवर ट्रेड करत होता. ‘सूर्यलता स्पिनिंग मिल्स’ कंपनीचे एकूण बाजार भांडवल 256 कोटी रुपये आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Suryalata Spinning Mills Share Price 514138 on 20 March 2023.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
RVNL Share Price | पीएसयू रेल्वे कंपनी शेअरबाबत फायद्याची अपडेट, अपसाईड टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RVNL
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीचा शेअर देईल 39 टक्के परतावा, ही अपडेट जाणून घ्या - NSE: ADANIPOWER
-
NTPC Green Energy Share Price | 107 रुपयांचा शेअर 150 रुपये टार्गेट प्राईस गाठणार; अशी संधी सोडू नका - NSE: NTPCGREEN
-
BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर प्राईसची दिशा ठरली, बिनधास्त खरेदी करावा असा शेअर - NSE: BEL
-
Suzlon Share Price | तब्बल 2391 टक्के परतावा देणारा शेअर पुन्हा मालामाल करणार; फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर जबरदस्त परतावा देणार; ही आहे पुढची टार्गेट प्राईस - NSE: JIOFIN
-
IRFC Share Price | मल्टिबॅगर रेल्वे स्टॉक मालामाल करणार, शॉर्ट टर्म अपसाईड टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IRFC