27 April 2024 4:12 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत 43 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल Man Industries Share Price | मालामाल करणारा शेअर! एका वर्षात 350 टक्के परतावा, पुढेही जोरदार कमाई होईल Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 27 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Multibagger Stocks | व्होडाफोन आयडिया शेअरसहित हे 2 शेअर्स देतील मल्टिबॅगर परतावा, तज्ज्ञांनी काय म्हटले? NMDC Share Price | सुवर्ण संधी! हा शेअर श्रीमंत करेल, अल्पवधीत देईल 140 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TAC Infosec Share Price | आयुष्य बदलणारा शेअर! अवघ्या 20 दिवसात दिला 400% परतावा, खरेदी करणार? Indian Hotel Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा ग्रुपचा मल्टिबॅगर शेअर मोठा परतावा देईल, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

Suzlon Energy Share Price | सुझलॉन एनर्जीचे शेअर्स स्वस्तात उपलब्ध, विजेच्या वाढत्या मागणीचा फायदा कंपनीला होणार?

Suzlon Energy Share Price

Suzlon Energy Share Price | सध्या वाढत्या तापमानासोबत एनर्जी सेक्टरमधील स्टॉकमध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. सोमवार दिनांक 13 मार्च 2023 रोजी ‘सुझलॉन एनर्जी’ कंपनीचे शेअर्स 2.38 टक्के घसरणीसह 8.20 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरमध्ये 9.39 टक्के पडझड पाहायला मिळाली आहे. मात्र वाढत्या विजेच्या मागणीमुळे या कंपनीच्या शेअर्समध्ये ही वाढ पाहायला मिळू शकते.

‘सुझलॉन एनर्जी’ कंपनीचे डिसेंबर 2022 तिमाहीचे निकाल किंचित सकारात्मक होते. वास्तविक डिसेंबर 2022 तिमाहीत ‘सुझलॉन एनर्जी’ कंपनीच्या निव्वळ नफ्यात दुप्पट वाढ झाली होती. मागील पाच वर्षांत ‘सुझलॉन एनर्जी’ कंपनीचे शेअर्स 97 टक्के पडले होते. या दरम्यानच्या काळात शेअरची किंमत 355 रुपयेवरून घसरून 8.15 रुपयेवर आली आहे. वाढत्या विजेच्या मागणीच्या पार्श्वभूमीवर पुढील काळात ‘सुझलॉन एनर्जी’ कंपनीचे शेअर्स तेजीत येऊ शकतात, असे मत तज्ञांनी व्यक्त केले आहे.

चालू आर्थिक वर्षाच्या डिसेंबर 2022 तिमाहीत ‘सुझलॉन एनर्जी लिमिटेड’ कंपनीने चांगला नफा कमावला होता. कंपनीचा एकत्रित निव्वळ नफा दुप्पट वाढीसह 78.28 कोटी रुपयेवर पोहचला होता. कंपनीच्या खर्चात कपात झाल्याने तिमाही नफ्यात ही वाढ पाहायला मिळाली होती. तर मागील आर्थिक वर्षाच्या ऑक्टोबर-डिसेंबर 2021 तिमाहीत कंपनीने 36.77 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. ‘सुझलॉन एनर्जी’ कंपनीचा महसूल समीक्षाधीन तिमाहीत 1,615 कोटी रुपयांवरून घसरून 1,464 कोटी रुपयांवर आला होता. या काळात कंपनीचा एकूण खर्चही मागील वर्षीच्या 1,573 कोटी रुपयेच्या तुलनेत 1,386 कोटी रुपयांवर आला आहे.

कंपनीचे स्पष्टीकरण :
निवेदन जाहीर करून सुझलॉन एनर्जी उद्योग समूहाचे उपाध्यक्ष गिरीश तांती यांनी आपली बाजू मांडली होती, त्यात ते म्हणाले होते की, “2023 या नवीन वर्षाची सुरुवात पवन ऊर्जा क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण धोरणात्मक घोषणांसह अतिशय उत्साहवर्धक नोंदीसह झाली आहे. सध्या वाढत्या तापमानातील वाढीमुळे विजेची मागणी वाढेल, आणि ‘सुझलॉन एनर्जी’ कंपनीला या संधीचा फायदा घेता येईल. भारतीय पवन ऊर्जा क्षेत्रातील कंपन्या देशाच्या विकासात तसेच पर्यावरण पूरक ऊर्जा निर्मिती क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देण्यास सदैव तयार आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Suzlon Energy Share Price return on investment check details on 13 March 2023.

हॅशटॅग्स

#Suzlon Energy Share Price(23)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x