12 December 2024 10:28 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Samvardhana Motherson Share Price | संवर्धना मदरसन सहित हे 4 शेअर्स 45% पर्यंत परतावा देतील, फायदा घ्या - NSE: MOTHERSON Post Office Schemes | बक्कळ पैसा कमवायचाय; पोस्टाच्या या 4 योजनांमध्ये पैसे गुंतवा, मोठ्या परताव्यासाठी अत्यंत खास योजना Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेऊन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करताय, मग लोनसंबंधीत या गोष्टींची माहिती घ्या Investment Tips | पगारवाढ झाल्यावर EMI भरायचे की, SIP मध्ये गुंतवायचे; कोणता पर्याय निवडता, फायदा कुठे आहे जाणून घ्या NHPC Vs NTPC Share Price | NHPC आणि NTPC हे पॉवर शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC GMP IPO | स्वस्त IPO आला रे, पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी पैसे दुप्पट होतील, संधी सोडू नका - IPO GMP RVNL Share Price | RVNL सहित हे 2 रेल्वे कंपनी शेअर्स देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL
x

IDBI Bank Recruitment 2023 | आयडीबीआय बँकेत 600 जागांसाठी भरती, पगार 63,840 रुपये, असा ऑनलाईन अर्ज करा

IDBI Bank Recruitment 2023

IDBI Bank Recruitment 2023 | सरकारी नोकरी कोणाला नको आहे? आजही मोठ्या संख्येने लोक सरकारी नोकरीची तयारी करतात. त्यातही तरुणांमध्ये बँकेबाबत मोठी स्पर्धा आहे. आता आम्ही बँकेत काम करण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी एक खुशखबर देणार आहोत. वास्तविक आयडीबीआय बँकेत असिस्टंट मॅनेजरची नोकरी समोर आली आहे. जर तुम्ही या पदासाठी इच्छुक असाल तर आज अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. असिस्टंट मॅनेजर या पदासाठी तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता.

जर तुम्हाला आयडीबीआय बँकेत असिस्टंट मॅनेजर पदासाठी अर्ज करायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला www.idbibank.in आयडीबीआय बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल. या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आज म्हणजेच 28 फेब्रुवारी ठेवण्यात आली आहे. या पदासाठी अर्जदाराला एप्रिल 2023 रोजी ऑनलाइन परीक्षा द्यावी लागेल. आयडीबीआय बँकेने दिलेल्या माहितीनुसार असिस्टंट मॅनेजरच्या 600 पदांवर भरती केली जाणार आहे.

आयडीबीआय बँकेत असिस्टंट मॅनेजरसाठी पात्रता निकष काय आहेत?
आयडीबीआय बँकेत असिस्टंट मॅनेजर पदासाठी अर्ज करण्यासाठी अर्जदाराचे वय २१ ते ३० वर्षादरम्यान असावे. त्याच्याकडे कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून पदवी असणे आवश्यक आहे. तसेच उमेदवाराला बँकिंग वित्तीय सेवा किंवा विमा क्षेत्रातील कामाचा किमान दोन वर्षांचा अनुभव असावा.

किती पगार मिळणार?
जर उमेदवाराची आयडीबीआय बँकेत निवड झाली तर त्याला दरमहा 36,000 ते 63,840 रुपये वेतनश्रेणीवर आधारित वेतन मिळेल. याशिवाय इतर भत्तेही दिले जातील.

आयडीबीआय बँक असिस्टंट मॅनेजर पदासाठी अर्ज कसा करावा?
* सर्वप्रथम तुम्हाला आयडीबीआय बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर जावे idbibank.in.
* आता करिअर टॅबवर क्लिक करा.
* आता असिस्टंट मॅनेजर (ग्रेड ए) भरती – 2023-24 अर्ज लिंकवर क्लिक करा.
* आता मागितलेली माहिती भरा.
* अर्ज भरल्यानंतर शुल्क भरावे.
* आता अर्जाची प्रिंटआऊट घ्या.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: IDBI Bank Recruitment 2023 for 600 assistant manager posts check details on 13 March 2023.

हॅशटॅग्स

#IDBI Bank Recruitment 2023(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x