25 March 2025 9:43 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Trident Share Price | ट्रायडंट शेअर 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीजवळ, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: TRIDENT GTL Infra Share Price | जीटीएल इन्फ्रा शेअरमध्ये घसरण, महत्वाची अपडेट, टार्गेट प्राईस अनुमान जाणून घ्या - NSE: GTLINFRA Bonus Share News | फ्री बोनस शेअर्स देणार ही कंपनी, झटपट मोठी कमाई, शेअर्स खरेदीला ऑनलाईन गर्दी Horoscope Today | 26 मार्च 2025; तुमच्यासाठी बुधवारचा दिवस कसा असेल, बुधवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | आकड्यांचा खेळ, अंकज्योतिषशास्त्रानुसार बुधवार 26 मार्च रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या SBI FD Interest Rates | एसबीआय बँकेच्या ग्राहकांसाठी अपडेट, सर्वाधिक व्याजदर देणाऱ्या FD मध्ये पैसे गुंतवा, मोठा परतावा मिळवा TATA Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून फायद्याचा सल्ला - NSE: TATAMOTORS
x

Suzlon Energy Share Price | फक्त 8 रुपयांचा सुझलॉन एनर्जीचा शेअर तेजीत, कारण काय? पुढे बक्कळ कमाई करून देणार?

Suzlon Energy Share Price

Suzlon Energy Share Price | ‘सुझलॉन एनर्जी’ कंपनीला ‘जुनिपर ग्रीन एनर्जी’ कंपनीतर्फे 69.3 मेगावॅट क्षमतेचा पवन ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी कंत्राट देण्यात आला आहे. हा प्रकल्प गुजरात राज्यातील सुरेंद्र नगर जिल्ह्यात उभारण्याचे नियोजित आहे. 2024 पर्यंत हा प्रकल्प सुरू होण्याची शक्यता आहे. या कंपनीने मंगळवारी एक निवेदन जाहीर करून ही प्रकल्पाची माहिती दिली आहे. बुधवार दिनांक 3 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.62 टक्के वाढीसह 8.15 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

Suzlon Energy Limited Stock Price Today on NSE & BSE

कंपनीचे स्पष्टीकरण :
‘सुझलॉन एनर्जी’ समूहाने जुनिपर ग्रीन एनर्जी प्रायव्हेट लिमिटेडकडून 69.3 मेगावॅट क्षमतेचा पवन ऊर्जा प्रकल्प विकासासाठी आणि तीन मेगावॅट उत्पादन श्रेणीची दुसरी ऑर्डर प्राप्त केली आहे. तथापि कंपनीने या कराराचे मूल्य अद्याप जाहीर केलेले नाही.

सुझलॉन कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी ‘जेपी चालसानी’ यांनी माहिती दिली आहे की, “ज्युनिपर ग्रीन एनर्जी कंपनीकडून पहिल्या ऑर्डरची आणि तीन मेगावॅटच्या प्रकल्पांची दुसरी ऑर्डर मिळाली असल्याने आम्हाला खूप आनंद होत आहे”. सुझलॉन हायब्रिड लॅटिस ट्युब्युलर टॉवरसह हे 3.15 मेगावॅट क्षमतेचे 22 विंड टर्बाइन जनरेटर स्थापित करेल.

सविस्तर करार:
या करारानुसार सुझलॉन कंपनी आपल्या ग्राहक कंपनीला विंड टर्बाइन पुरवठा करणार आहे. आणि प्रकल्पाचे बांधकाम करून त्याला कार्यान्वित करून देणार आहे. प्रकल्प सुरू झाल्यानंतर सुझलॉन कंपनी त्याची देखभाल आणि दुरुस्तीचे काम देखील करणार आहे.

शेअर्सची स्थिती :
मागील काही काळापासून ‘सुझलॉन एनर्जी’ कंपनीच्या शेअर्समध्ये मंदी पाहायला मिळत होती. एकेकाळी ‘सुझलॉन एनर्जी’ कंपनीचे शेअर्स 379 रुपये या आपल्या विक्रमी उच्चांक पातळीवर ट्रेड करत होते. तिथून हा स्टॉक 98 टक्के खाली घसरला आहे. YTD आधारे हा स्टॉक 24.30 टक्के कमजोर झाला आहे.

मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरची किंमत 16.41 टक्के कमजोर झाली आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 5.43 रुपये होती. 52 आठवड्यांची उचांनक किंमत पातळी 12.19 रुपये होती.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Suzlon Energy Share Price Today on 03 May 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Suzlon Energy Share Price(23)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या