
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरमध्ये किंचित तेजी पाहायला मिळत आहे. नुकताच ब्रोकरेज फर्म मॉर्गन स्टॅनलीने सुझलॉन एनर्जी कंपनीच्या (NSE: Suzlon) स्टॉकची रेटिंग अपग्रेड केली आहे. ब्रोकरेज हाऊसने या स्टॉकची रेटिंग ‘इक्वलवेट’ केली जी पूर्वी ‘ओव्हरवेट’ होती. (सुझलॉन एनर्जी कंपनी अंश)
मागील आठवड्यात शुक्रवारी सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 1 टक्के घसरणीसह 81.08 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. आज मंगळवार दिनांक एक ऑक्टोबर 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स टक्के 0.95 वाढीसह 80.81 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
टारगेट प्राईज आणि परतावा :
ब्रोकरेज हाऊस मॉर्गन स्टॅन्लीने सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सची टार्गेट प्राईज वाढवली आहे. मॉर्गन स्टॅन्लीने सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरची टारगेट प्राईस 73 रुपयेवरून वाढवून 88 रुपये केली आहे. मागील सहा महिन्यात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. या काळात गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट वाढले आहेत. गेल्या सहा महिन्यांमध्ये निफ्टी 50 निर्देशांक 78 टक्क्यांनी वाढला होता.
स्टॉक वाढीचे नेमके कारण :
सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरमध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे मागील काही महिन्यात या कंपनीला मोठ्या प्रमाणात ऑर्डर्स मिळाल्या आहेत. या कंपनीचा ताळेबंद आणि रोख प्रवाह देखील सुधारला आहे. सध्या सुझलॉन एनर्जी कंपनीची ऑर्डर बुक 5 GW वर पोहोचली आहे. पवन ऊर्जा क्षेत्रातील वाढीचा फायदा सुझलॉन एनर्जी कंपनीला होत आहे. ब्रोकरेज फर्म मॉर्गन स्टॅनलीचा विश्वास आहे की या कंपनीकडे आर्थिक वर्ष 2025 ते 2030 पर्यंत 32 गिगावॉटच्या नवीन ऑर्डर असतील. त्यामुळे अनेक तज्ञ या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याची शिफारस करत आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.