
Suzlon Share Price | सोमवार 30 डिसेंबर 2024 रोजी शेअर बाजारात कोरकोळ घसरण पाहायला मिळाली होती. स्टॉक मार्केट बीएसई सेन्सेक्स 60.04 अंकांनी वधारून 78639.03 वर पोहोचला होता. तर स्टॉक मार्केट निफ्टी 19.20 अंकांनी वधारून 23,794 अंकांवर पोहोचला होता. दरम्यान, सुझलॉन एनर्जी कंपनीबाबत महत्वाची अपडेट आली आहे.
सुझलॉन एनर्जी शेअरची सध्याची स्थिती
सोमवार, 30 डिसेंबर 2024 रोजी सुझलॉन एनर्जी शेअर 1.30 टक्क्यांनी घसरून 62.43 रुपयांवर पोहोचला होता. सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनी शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांकी स्तर 86.04 रुपये होता, तर शेअरचा 52 आठवड्यांचा नीचांकी स्तर 35.50 रुपये होता. सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनीचं एकूण मार्केट कॅप सध्या 84,634 कोटी रुपये आहे.
सुझलॉन एनर्जी कंपनीबाबत मोठी अपडेट
१७३ कोटी रुपयांच्या दंड प्रकरणात सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनीच्या बाजूने निर्णय आला आहे. आयटीएटीने सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनीवरील दंड रद्द केला आहे. इन्कम टॅक्स अपीलल ट्रिब्युनलने सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनीवरील दंड फेटाळून लावला होता.
एफआयआयने शेअर्सची खरेदी खरेदी केली
दरम्यान, परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनी शेअर्सची खरेदी सुरूच ठेवली आहे. सप्टेंबर २०२३ सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनीमध्ये FII चा हिस्सा १०.८८ टक्के होता. तर सप्टेंबर २०२४ मध्ये हा हिस्सा २३.७२ टक्क्यांपर्यंत वाढला आहे.
सुझलॉन शेअरने किती परतावा दिला
मागील ५ दिवसात सुझलॉन एनर्जी शेअर 2.17% घसरला आहे. मागील १ महिन्यात हा शेअर 5.81% घसरला आहे. मागील ६ महिन्यात या शेअरने 17.66% परतावा दिला आहे. मागील १ वर्षात सुझलॉन एनर्जी शेअरने 61.77% परतावा दिला आहे. मागील ५ वर्षात सुझलॉन एनर्जी शेअरने 2,411.29% परतावा दिला आहे. YTD आधारावर या शेअरने 61.77% परतावा दिला आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.