
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरमध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. पवन ऊर्जा निर्मिती क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स मागील काही दिवसापासून अप्पर सर्किट हीट करत आहेत. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 36 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
आज देखील या कंपनीच्या शेअरमध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. सुझलॉन एनर्जी कंपनीचे एकूण बाजार भांडवल 48830 कोटी रुपये आहे. मागील 6 महिन्यांत सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 350 टक्के परतावा कमावून दिला आहे. आज बुधवार दिनांक 8 नोव्हेंबर 2023 रोजी सुझलॉन एनर्जी स्टॉक 2.54 टक्के वाढीसह 38.30 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
सुझलॉन एनर्जी स्टॉकमध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, या पवन ऊर्जा कंपनीला नुकताच 50.4 मेगावॅट क्षमतेच्या पवन ऊर्जा प्रकल्पाचे काम करण्याचे कॉन्ट्रॅक्ट मिळाले आहे. यासोबतच चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत कंपनीने उत्कृष्ट कामगिरी केली आहे. म्हणून सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्समध्ये बंपर वाढ पाहायला मिळत आहे.
सुझलॉन एनर्जी ही कंपनी पवन उर्जा क्षेत्रात एक दिग्गज कंपनी मानली जाते. ही कंपनी आपल्या ग्राहकांना विंड टर्बाइन सोल्यूशन्स सेवा प्रदान करण्याचे काम करते. या कंपनीचे अत्याधुनिक संशोधन आणि डिझाइन केंद्र भारतात स्थित आहे. सुझलॉन कंपनीकडे सध्या 1582 मेगावॅट क्षमतेचा ऑर्डर प्रलंबित आहेत.
सुझलॉन एनर्जी कंपनी उच्च मूल्याच्या उच्च मार्जिन ऑर्डरवर काम करण्याची योजना आखत आहे. सुझलॉन एनर्जी कंपनीला ज्या ऑर्डर मिळाल्या आहेत, त्यापैकी निम्म्या ऑर्डर 2024 पर्यंत पूर्ण करायच्या आहेत. या कंपनीने आपली ऑपरेटिंग कामगिरी चांगल्या प्रमाणात सुधारली असून, सप्टेंबर 2023 तिमाहीत 79 टक्के वाढीसह 102 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे.
मागील वर्षीच्या सप्टेंबर तिमाहीत कंपनीने फक्त 57 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. या वर्षी दुसर्या तिमाहीत कंपनीने 1417 कोटी रुपये ऑपरेटिंग महसूल संकलित केला आहे. तर मागील वर्षी कंपनीने 1,430 कोटी रुपये महसूल संकलित केला होता.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.