
Suzlon Share Price | अल्पावधीत आपल्या गुंतवणुकदारांना मल्टीबॅगर रिटर्न्स देणाऱ्या सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. पवन ऊर्जा क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स आज विक्रीच्या दबावात ट्रेड करत आहेत. मागील पाच दिवसांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 17.65 टक्के परतावा कमावून दिला आहे.
10 नोव्हेंबर रोजी या कंपनीचे शेअर्स 37.40 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर मागील आठवड्यात शुक्रवारी सुझलॉन एनर्जी स्टॉक 43.95 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. आज मंगळवार दिनांक 21 नोव्हेंबर 2023 रोजी सुझलॉन एनर्जी स्टॉक 4.96 टक्के वाढीसह 39.30 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
मागील सहा महिन्यांत सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 400 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदरांचे पैसे 49.15 टक्के वाढवले आहे. सहा महिन्यांपूर्वी म्हणजेच 17 मे 2023 रोजी सुझलॉन एनर्जी स्टॉक 8.65 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. तर आता या कंपनीचे शेअर्स 39 रुपये किमतीवर पोहचले आहेत.
मागील पाच वर्षांत सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 829.18 टक्के परतावा कमावून दिला आहे. 2023 या वर्षाच्या सुरुवातीपासून आतापर्यंत सुझलॉन एनर्जी स्टॉक 310.75 टक्के वाढला आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 449.38 टक्के नफा कमावून दिला आहे.
30 नोव्हेंबर 2018 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.73 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. आता हा स्टॉक 829.18%m टक्के वाढला आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 44 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 6.95 रुपये होती. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 570.34 अब्ज रुपये आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.