11 December 2024 5:25 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
GMP IPO | स्वस्त IPO आला रे, पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी पैसे दुप्पट होतील, संधी सोडू नका - IPO GMP RVNL Share Price | RVNL सहित हे 2 रेल्वे कंपनी शेअर्स देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Penny Stocks | 13 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, सतत अप्पर सर्किट, मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2024 Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन Investment Formula | गुंतवणुकीचा 15-15-15 चा फॉर्म्युला आहे चमत्कारी, करोडपती व्यक्ती असाच पैसा वाढवतात - Marathi News IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर बुलेट ट्रेनच्या स्पीडने परतावा देणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग - NSE: IRFC Vedanta Share Price | वेदांता शेअरने विक्रमी उच्चांक गाठला, पुढे रॉकेट तेजी, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: VEDL
x

BEL Share Price | मल्टिबॅगर PSU BEL शेअरबाबत महत्वाची अपडेट, स्टॉक BUY करावा की SELL?

BEL Share Price

BEL Share Price | बीईएल म्हणजेच भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनीच्या शेअर्समध्ये कमालीची अस्थिरता पाहायला मिळत आहे. सोमवारी या कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या वाढीसह 325.65 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज हा स्टॉक किंचित घसरला आहे. या सरकारी कंपनीचे एकूण बाजार भांडवल 2.40 लाख कोटी रुपये आहे. जून तिमाहीत बीईएल कंपनीने 776.14 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. वार्षिक आधारावर कंपनीच्या निव्वळ नफ्यात 46.17 टक्के वाढ झाली आहे. ( भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनी अंश )

मागील वर्षी जून तिमाहीत या कंपनीने 530.84 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. जून 2024 तिमाहीत बीईएल कंपनीने 4,199 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. मागील वार्षिक याच तिमाहीत कंपनीने 3511 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. म्हणजेच वार्षिक आधारावर या कंपनीच्या महसुलात 19.6 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे. 1 जुलै 2024 रोजी या कंपनीच्या ऑर्डर बुकचा आकार 76,705 कोटी रुपये होता. आज मंगळवार दिनांक 30 जुलै 2024 रोजी बीईएल स्टॉक 0.58 टक्के घसरणीसह 319.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनीचे शेअर्स 123.55 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किमतीवरून 165 टक्क्यांनी वाढले आहेत. 2024 या वर्षात बीईएल स्टॉक 75 टक्क्यांनी मजबूत झाला आहे. मागील सहा महिन्यांत बीईएल कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 70 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 5 टक्क्यांनी वाढली आहे.

जून 2024 तिमाहीत बीईएल कंपनीचा EBITDA 41 टक्के वाढीसह 937 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. तर याच तिमाहीत कंपनीचा EBITDA मार्जिन 330 बेसिस पॉइंट्सने वाढून 22.3 टक्क्यांवर पोहचला आहे. मागील वर्षी जून तिमाहीत कंपनीचा EBITDA मार्जिन 19 टक्क्यांवर होता. बीईएल कंपनीच्या संचालक मंडळाने 20 मे 2024 रोजी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत 1 रुपये दर्शनी मूल्याच्या शेअर्सवर 80 टक्के म्हणजेच 0.80 रुपये प्रति शेअर अंतिम लाभांश वाटप करण्याची घोषणा केली होती. लाभांश वाटप करण्याचा प्रस्ताव शेअरधारकांच्या मंजुरीच्या अधीन आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | BEL Share Price NSE Live 30 July 2024.

हॅशटॅग्स

BEL Share Price(94)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x