2 May 2024 2:32 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | आला रे आला IPO आला! पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी मिळू शकतो मल्टिबॅगर परतावा Vedanta Share Price | वेदांता शेअर्समध्ये मजबूत तेजी, स्टॉकने 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला, आता रु.500 पार होणार? Yes Bank Share Price | तज्ज्ञांकडून येस बँक शेअर्सची रेटिंग जाहीर, चिंता वाढली, स्टॉक Hold करावा की Sell? Penny Stocks | एका वडापावच्या किमतीत 8 शेअर्स खरेदी करू शकता, मालामाल करणाऱ्या 10 पेनी शेअर्सची यादी Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड आणि टाटा मोटर्ससहित हे टॉप 5 शेअर्स तगडा परतावा देणार, खरेदीला ऑनलाईन गर्दी Adani Gas Share Price | अदानी टोटल गॅस शेअर्सवर 'बाय' रेटिंग, तज्ज्ञांकडून खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस जाहीर Reliance Home Finance Share Price | शेअर प्राईस 4 रुपये, हा स्वस्त स्टॉक पुन्हा चर्चेत आला, शेअर्स खरेदी वाढणार?
x

PTC India Share Price | अल्पावधीत 100 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा देणारा पीटीसी इंडिया शेअर तेजीत, शेअरची पुढची टार्गेट प्राईस किती?

PTC India Share Price

PTC India Share Price | पीटीसी इंडिया कंपनीचे शेअर्स शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 9 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होते. या कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ होण्याचे कारण म्हणजे, तेल आणि वायू क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या ONGC लिमिटेड कंपनीने PTC इंडियाची उपकंपनी विकत घेण्यासाठी सर्वात मोठी बोली जाहीर केली आहे.

या लिलावासाठी ONGC कंपनीने 925 कोटी रुपये खर्च करण्याची घोषणा केली आहे. या बातमीमुळे शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये पीटीसी इंडिया स्टॉक तेजी वाढत आहे. शुक्रवार दिनांक 20 ऑक्टोबर 2023 रोजी पीटीसी इंडिया स्टॉक 5.45 टक्के वाढीसह146.00 रुपये किमतीवर क्लोज झाला होता.

स्टॉक एक्सचेंजला दिलेल्या माहितीत, पीटीसी इंडिया कंपनीने कळवले आहे की, कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक 19 ऑक्टोबर 2023 रोजी आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत पीटीसी इंडिया कंपनीची उपकंपनी असलेल्या PTC Energy Ltd कंपनीचे 100 टक्के भाग भांडवल विकण्याचा प्रस्ताव मान्य करण्यात आला आहे. यासाठी ONGC ने 925 कोटी रुपयेची बोली लावली आहे.

PTC एनर्जी लिमिटेड कंपनीची स्थापना 2008 साली करण्यात आली होती. या कंपनीचा मध्य प्रदेश राज्यात 288.80 मेगावॅट क्षमतेचा अक्षय ऊर्जा प्रकल्प, कर्नाटक राज्यात 50 मेगावॅटचा अक्षय ऊर्जा प्रकल्प, आंध्र प्रदेश राज्यात 188.80 मेगावॅट क्षमतेचा पवन ऊर्जा प्रकल्प कार्यरत आहे. मागील 6 महिन्यांत पीटीसी इंडिया कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 59 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 100 टक्क्यांपेक्षा जास्त वाढवले आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | PTC India Share Price NSE 21 October 2023.

हॅशटॅग्स

#PTC India Share Price(6)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x