
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी स्टॉक मंगळवार दिनांक 30 जुलै रोजी 5 टक्क्यांच्या वाढीसह 68.22 रुपये किमतीवर पोहचला होता. आज मात्र या स्टॉकमध्ये जबरदस्त नफा वसुली पाहायला मिळत आहे. नुकताच या कंपनीने आपले जून तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. त्यानंतर हा स्टॉक 23 टक्क्यांनी वाढला होता. जून तिमाहीत या कंपनीच्या निव्वळ नफ्यात जवळपास 200 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे. ( सुझलॉन एनर्जी अंश )
जून 2024 तिमाहीत या कंपनीने 1,348 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. मागील वर्षी याच तिमाहीत कंपनीने 302 कोटी रुपये नफा कमावला होता. जून तिमाहीत सुझलॉन एनर्जी कंपनीचा महसूल 50 टक्क्यांच्या वाढीसह 2,016 कोटी रुपयेवर पोहचला आहे. आज गुरूवार दिनांक 1 ऑगस्ट 2024 रोजी सुझलॉन एनर्जी स्टॉक 3.36 टक्के घसरणीसह 67.05 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
जून तिमाहीत सुझलॉन एनर्जी कंपनीच्या ऑर्डर बुकचा आकार 3.8 GW होता. कंपनीची तिमाही कामगिरी पाहून आनंद राठी फर्मने सुझलॉन एनर्जी स्टॉकची टार्गेट प्राइस अपडेट केली आहे. ब्रोकरेज फर्म मॉर्गन स्टॅनलीने सुझलॉन एनर्जी कंपनीच्या स्टॉकवर ‘ओव्हरवेट’ रेटिंग देऊन 73.5 रुपये टार्गेट प्राइस जाहीर केली आहे. जून तिमाहीत सुझलॉन एनर्जी कंपनीने एकूण 274 मेगावॅट वीज वितरण केले आहे. जे पूर्वीच्या 250 मेगावॅटच्या तुलनेत चांगले आहे.
मागील एका वर्षात सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 277 टक्के परतावा कमावून दिला आहे. ब्रोकरेज फर्म आनंद राठीने सुझलॉन एनर्जी स्टॉकची रेटिंग ‘होल्ड’ अशी केली आहे. यासह तज्ञांनी हा स्टॉक 69 रुपये किमतीवर जाण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. तज्ञांच्या मते, सुझलॉन एनर्जी स्टॉकने 55 रुपये किमतीवर मजबूत सपोर्ट निर्माण केला आहे. जर हा स्टॉक सपोर्ट लेव्हलच्या वर टिकला तर शेअरची किंमत 75 रुपयेवर जाऊ शकते.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.