 
						Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स तुफान तेजीत वाढत आहेत. मागील 9 ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीच्या शेअर्सची किंमत 31 टक्के वाढली आहे. गुरुवारी या कंपनीचे शेअर्स 2.3 टक्के वाढीसह 71 रुपये किमतीवर पोहोचले होते. या कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, कंपनीने जून तिमाहीत 200 टक्के वाढीसह 300 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. ( सुझलॉन एनर्जी कंपनी अंश )
मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 31 टक्के वाढली आहे. सुझलॉन एनर्जी स्टॉकचा रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स 87 वर असून हा स्टॉक ओव्हरबॉट झोनमध्ये पोहचला आहे. आज शुक्रवार दिनांक 2 ऑगस्ट 2024 रोजी सुझलॉन एनर्जी स्टॉक 2.43 टक्के वाढीसह 69.63 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. ट्रेडबुल्स सिक्युरिटीज फर्मच्या तज्ञांच्या मते, सुझलॉन एनर्जी स्टॉक 115 रुपये किमतीवर जाऊ शकतो.
आनंद राठी फर्मच्या तज्ञांच्या मते, सुझलॉन एनर्जी स्टॉकमध्ये पैसे लावताना सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. जून 2024 तिमाहीमध्ये सुझलॉन एनर्जी कंपनीने 2,016 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. मागील वर्षीच्या याच तिमाहीत कंपनीने 1,348 रुपये महसूल संकलित केला होता, जो वार्षिक आधारावर 50 टक्के वाढला आहे.
सुझलॉन ग्रुपचे सीएफओ हिमांशू मोदी यांनी आपल्या निवेदनात माहिती दिली की, कंपनीच्या ऑर्डर बुकचा आकार सध्या 3.8 GW आहे. याची पूर्तता कंपनीला पुढील 18-24 महिन्यांत करायची आहे. या ऑर्डरमध्ये कंपनी 17 टक्के ते 18 टक्के दरम्यान मार्जिन बँड राखू शकते. सुझलॉन एनर्जी कंपनीचा IPO 2005 मध्ये 500 रुपये किमतीवर लाँच करण्यात आला होता. 2019 पर्यंत या कंपनीच्या शेअर्सची किंमत 2 रुपयेवर आली होती. या किमतीवरून हा स्टॉक आतापर्यंत 3450 टक्के वाढला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		