
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स शुक्रवार दिनांक 2 ऑगस्ट रोजी 5 टक्क्यांच्या वाढीसह 71.37 रुपये किमतीवर पोहचले होते. आज मात्र या कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त नफा वसुली पाहायला मिळत आहे. या कंपनीने जून तिमाहीमध्ये जबरदस्त कामगिरी केली आहे. मागील एका महिन्यात सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सची किंमत 31 टक्क्यांनी मजबूत झाली आहे. ( सुझलॉन एनर्जी कंपनी अंश )
2024 या वर्षाच्या सुरुवातीपासून आतापर्यंत सुझलॉन एनर्जी स्टॉक 85 टक्के मजबूत झाला आहे. आज सोमवार दिनांक 5 ऑगस्ट 2024 रोजी सुझलॉन एनर्जी स्टॉक 3.74 टक्के घसरणीसह 68.68 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
जून तिमाहीत सुझलॉन एनर्जी कंपनीचा निव्वळ नफा वार्षिक आधारावर 200 टक्क्यांनी वाढून 302 कोटी रुपयेवर पोहचला आहे. याकाळात कंपनीचा महसूल 50 टक्क्यांनी वाढून 2,016 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. मागील वर्षी याच तिमाहीत कंपनीचा महसूल 1,348 कोटी रुपये नोंदवला गेला होता. जून तिमाहीत कंपनीच्या ऑर्डर बुकचा आकार 3.8 GW होता. कंपनीच्या व्यवस्थापन मंडळाने सांगितले आहे की, कंपनीची ऑर्डर बुक भविष्यात महसुलात वाढ करण्यास सहाय्य करु शकते.
मॉर्गन स्टॅन्ली फर्मने सुझलॉन एनर्जी स्टॉकवर ‘ओव्हरवेट’ रेटिंग देऊन 58.5 रुपये टारगेट प्राइस जाहीर केली आहे. देशांतर्गत ब्रोकरेज फर्म नुवामा इन्स्टिट्यूशनल इक्विटीजने सुझलॉन एनर्जी स्टॉकवर ‘होल्ड’ रेटिंग देऊन 64 रुपये टार्गेट प्राइस जाहीर केली आहे. कंपनीच्या व्यवसाय वाढीला मजबूत उद्योग वाढ, तांत्रिक प्रगती, 4.5GW पेक्षा जास्त क्षमता, उच्च मार्जिन O&M सेवा आणि सुधारित ताळेबंद यांचा आधार मिळत आहे.
सुझलॉन एनर्जी कंपनीला भारतात आणि परदेशातून नूतनीकरणक्षम उर्जेच्या वाढत्या मागणीचा फायदा होत आहे. ब्रोकरेज फर्मला विश्वास आहे की, या कंपनीचे शेअर्स पुढील काळात 73 रुपये किमतीवर जाऊ शकतात. जेएम फायनान्शिअल फर्मने सुझलॉन एनर्जी स्टॉकवर ‘बाय’ रेटिंग देऊन 71 रुपये टार्गेट प्राइससाठी गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.