
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी या नवीकरणीय ऊर्जा सोल्यूशन्स सेवा प्रदान करणाऱ्या कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळाली आहे. नुकताच सुझलॉन एनर्जी समूहाने एव्हररिन्यू एनर्जी कंपनीकडून 225 मेगावॅट क्षमतेच्या पवन ऊर्जा प्रलापाच्या उभारणीचा कॉन्ट्रॅक्ट जिंकला आहे.
त्यामुळे सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्समध्ये अफाट तेजी पाहायला मिळत आहे. शुक्रवार दिनांक 5 जानेवारी 2024 रोजी सुझलॉन एनर्जी स्टॉक 4.91 टक्के वाढीसह 40.60 रुपये किमतीवर क्लोज झाला होता.
मागील एका वर्षभरात सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 284 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 5 दिवसात सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सची किंमत 2 टक्क्यांपेक्षा जास्त वाढली आहे. मागील सहा महिन्यांत सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 126 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 5 वर्षात सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 702 टक्के नफा कमावून दिला आहे.
सुझलॉन एनर्जी कमोजोच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 6.95 रुपये होती. तर आता या कंपनीचे शेअर्स 44 रुपये या आपल्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत आहेत. नुकताच सुझलॉन एनर्जी कंपनीला त्रिची जिल्ह्यातील वेंगाईमंडलम आणि तमिळनाडूमधील तुतीकोरीन जिल्ह्यातील ओट्टापीदारम येथे एव्हररेन्यू एनर्जीच्या साइटवर हायब्रिड लॅटिस ट्युब्युलर टॉवर आणि 75 विंड टर्बाइन जनरेटर प्रकल्प स्थापन करण्याचा कॉन्ट्रॅक्ट मिळाला आहे.
या प्रत्येक युनिटची रेट क्षमता तीन मेगावाट आहे. एव्हररिन्यू एनर्जीसह निर्माण करण्यात येणार हा प्रकल्प भारतीय बाजारपेठेतील व्यावसायिक आणि औद्योगिक विभागाशी सुसंगत आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.