
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. सोमवारी या कंपनीचे शेअर्स 5 टक्के अपर सर्किटसह 80.40 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. जानेवारी 2010 नंतर पहिल्यांदाच हा स्टॉक या किमतीवर पोहचला आहे. सलग चौथ्या दिवशी सुझलॉन एनर्जी स्टॉकने अप्पर सर्किट हीट केला आहे. ( सुझलॉन एनर्जी कंपनी अंश )
मागील एका महिन्यात सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 47 टक्के परतावा कमावून दिला आहे.
या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 19.30 रुपये होती. आज मंगळवार दिनांक 13 ऑगस्ट 2024 रोजी सुझलॉन एनर्जी स्टॉक 4.22 टक्के वाढीसह 83.75 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. मागील 3 महिन्यांत सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 100 टक्के नफा कमावून दिला आहे.
9 मे 2024 रोजी सुझलॉन एनर्जी स्टॉक 39.60 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. 12 ऑगस्ट 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 80.40 रुपये किमतीवर पोहचले होते. याकाळात सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्समध्ये 103 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 109620 कोटी रुपये आहे.
2005 च्या शेवटी सुझलॉन एनर्जी स्टॉक शेअर बाजारात सूचीबद्ध झाला होता. IPO मध्ये या कंपनीच्या शेअरची किमत 500 रुपये होती. 3 एप्रिल 2020 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.02 रुपये किमतीवर आले होते. आता हा स्टॉक 80 रुपये किमतीवर पोहचला आहे. मागील 4 वर्षे आणि 4 महिन्यांत सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 3880 टक्के परतावा कमावून दिला आहे.
परकीय गुंतवणूकदार आणि म्युच्युअल फंडांनी सुझलॉन एनर्जी कंपनीमध्ये आपला वाटा वाढवला आहे. मार्च 2024 तिमाहीत परकीय संस्थात्मक गुंतवणूकदारांनी या कंपनीचे 19.57 टक्के भागभांडवल धारण केले होते. जून 2024 तिमाहीत परकीय गुंतवणूकदारांचा वाटा 21.53 टक्केवर पोहचला होता. म्युच्युअल फंडांनीही या कंपनीतील आपला वाट 1.8 टक्केवरून वाढवून 3.8 टक्के केला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.