15 December 2024 8:00 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NHPC Share Price | मल्टिबॅगर PSU एनएचपीसी शेअर रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: NHPC Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAPOWER NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर फोकसमध्ये, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तेजीचे संकेत - NSE: NBCC SBI Share Price | SBI बँक सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा, ब्रोकरेज बुलिश - NSE: SBIN Adani Energy Solutions Share Price | अदानी एनर्जी सहित या 6 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIENSOL Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांनी दिली टार्गेट प्राईस - NSE: TATATECH Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर ब्रेकआऊट देणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
x

RVNL Share Price | RVNL शेअर्स खरेदीला ऑनलाईन गर्दी, शॉर्ट टर्म मध्ये होणार मल्टिबॅगर कमाई

RVNL Share Price

RVNL Share Price | आरव्हीएनएल या सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. सोमवारी देखील आरव्हीएनएल स्टॉक 9 टक्क्यांच्या वाढीसह 524 रुपये किमतीवर पोहचला होता. मागील आठवड्यात शुक्रवारी भारत सरकारने 8 नवीन रेल्वे लाईन प्रकल्पांना मंजुरी दिली होती. यामुळे आरव्हीएनएल स्टॉक बुलेट ट्रेनच्या तेजीत वाढत आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 350 टक्के नफा कमावून दिला आहे. मागील सहा महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सची किंमत 145 टक्के वाढली आहे. ( आरव्हीएनएल कंपनी अंश )

2024 या वर्षात आरव्हीएनएल स्टॉक 209 टक्के मजबूत झाला आहे. आज मंगळवार दिनांक 13 ऑगस्ट 2024 रोजी आरव्हीएनएल स्टॉक 2.29 टक्के वाढीसह 589.05 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. जर तुम्ही एका वर्षापूर्वी आरव्हीएनएल कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक केली असती तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 350 टक्के वाढले असते. म्हणजेच ज्या लोकांनी एका वर्षापूर्वी या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य आता 4.50 लाख रुपये झाले आहे.

जून तिमाहीत आरव्हीएनएल कंपनीच्या एकत्रित निव्वळ नफ्यात 35 टक्क्यांनी घसरण पहायला मिळाली आहे. याकाळात कंपनीने 223.92 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. मागील वर्षी जून तिमाहीत आरव्हीएनएल कंपनीने 343.09 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. या कंपनीचे एकूण उत्पन्न मागील वर्षीच्या जून तिमाहीत 5,853.18 कोटी रुपये नोंदवले गेले होते. तर जून 2024 तिमाहीत या कंपनीने 4,336.75 कोटी रुपये कमाई केली होती.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | RVNL Share Price NSE Live 13 August 2024.

हॅशटॅग्स

RVNL Share Price(155)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x