 
						Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना मजबूत परतावा कमावून दिला आहे. 2 फेब्रुवारी रोजी या कंपनीच्या शेअरने 50 रुपये किंमत पातळी स्पर्श केली होती. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 50.72 रुपये होती. मागील एका महिन्यात सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 12 टक्के परतावा कमावून दिला आहे.
मागील सहा महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 140 टक्के परतावा कमावून दिला आहे. मात्र तज्ञांच्या मते, या कंपनीचे शेअर्स पुढील काळात आणखी वाढू शकतात. आज मंगळवार दिनांक 20 फेब्रुवारी 2024 रोजी सुझलॉन एनर्जी स्टॉक 0.76 टक्के वाढीसह 46.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
ब्रोकरेज फर्म चॉईस ब्रोकिंगच्या तज्ञांच्या मते, सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स पुढील काळात 60 रुपये किमतीवर जाऊ शकतात. चॉईस ब्रोकिंग फर्मच्या तज्ञांच्या मते, “सुझलॉन कंपनीच्या शेअरची किंमत टेक्निकल चार्ट पॅटर्नवर सकारात्मक पाहायला मिळत आहे. ज्या लोकांनी हा स्टॉक खरेदी केला आहे, त्यांना 45 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावून स्टॉक होल्ड करण्याचा सल्ला तज्ञांनी दिला आहे. अल्पावधीत या कंपनीचे शेअर्स 55 रुपये ते 60 रुपये किंमत स्पर्श करू शकतात, असा विश्वास तज्ञांनी व्यक्त केला आहे”.
मागील एका वर्षात सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 445.03 टक्के परतावा कमावून दिला आहे. या काळात कंपनीच्या शेअर्सची किंमत 8 रुपयेवरून वाढून सध्याच्या किमतीवर पोहोचली आहे. मागील पाच वर्षांत सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 780 टक्के परतावा कमावून दिला आहे. सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 50.72 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 6.96 रुपये होती. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 63,572.88 कोटी रुपये आहे.
चालू आर्थिक वर्ष 2023-24 च्या ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीत सुझलॉन एनर्जी कंपनीने मागील वर्षीच्या तुलनेत 160 टक्के वाढीसह 203.04 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. मागील आर्थिक वर्षात याच तिमाहीत कंपनीने 78.28 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. डिसेंबर तिमाहीत सुझलॉन एनर्जी कंपनीने 1,569.71 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे. तर मागील वर्षीच्या याच तिमाहीत कंपनीने 1,464.15 कोटी रुपये महसूल संकलित केला होता.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		