
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सने कर्जमुक्त झाल्यावर आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना अक्षरशः मालामाल केले आहे. शेअर बाजारातील तज्ञांच्या मते, या कंपनीचे शेअर्स पुढील काळात आणखी वाढू शकतात. ( सुझलॉन एनर्जी कंपनी अंश )
भारतात नविकरणक्षम ऊर्जा निर्मिती वाढत चालली आहे. याचा फायदा सुझलॉन एनर्जी सारख्या कंपन्यांना होत आहे. आज मंगळवार दिनांक 23 एप्रिल 2024 रोजी सुझलॉन एनर्जी स्टॉक 1.59 टक्के वाढीसह 41.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
शेअर बाजारातील तज्ञांच्या मते, सध्या जागतिक नकारात्मक संकेतामुळे भारतीय शेअर बाजारात अस्थिरता पाहायला मिळत आहे. मात्र पुढील 12 ते 15 महिन्यांत सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 50 रुपये किंमत स्पर्श करू शकतो. शेअर बाजारातील तज्ञांनी सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सवर 50 रुपये टार्गेट प्राइस जाहीर करून गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे.
सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 4.19 टक्के वाढीसह 41 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 50.60 रुपये होती. मागील एका वर्षात सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 413 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. 2024 या वर्षात सुझलॉन एनर्जी स्टॉक फक्त 6.49 टक्क्यांनी वाढला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.