29 February 2024 9:16 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 01 मार्च 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 01 मार्च 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Wipro Share Price | विप्रो शेअर प्राईस घसरणार? तज्ज्ञांनी टार्गेट प्राइस सोबत दिला महत्वाचा सल्ला Mazagon Dock Share Price | सरकारी कंपनीचा शेअर मालामाल करणार, याआधी 1 वर्षात 200% परतावा दिला, नेमकं कारण काय? Bonus Shares | फ्री शेअर्स मिळवा! ही कंपनी देतेय फ्री बोनस शेअर्स, अल्पावधीत वाढेल गुंतवणुकीचा पैसा Stocks To Buy | कमाईची मोठी संधी! हे टॉप 3 शेअर्स 50 टक्केपर्यंत परतावा देतील, लिस्ट सेव्ह करा Gold Rate Today | बापरे! आज सोन्याचा भाव मजबूत वाढला, तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर तपासून घ्या
x

SJVN Share Price | अल्पावधीत 109 टक्के परतावा देणारा एसजेव्हीएन शेअर तेजीत, किंमत 76 रुपये, ऑर्डरबुक मजबूत

SJVN Share Price

SJVN Share Price | एसजेव्हीएन लिमिटेड या ऊर्जा क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीचे शेअर्स तेजीत वाढत आहेत. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये एसजेव्हीएन लिमिटेड कंपनीचे शेअर्स 1.22 टक्क्यांच्या वाढीसह 76.09 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. एसजेव्हीएन लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, कंपनीला नवीन वर्क ऑर्डर मिळाली आहे.

एसजेव्हीएन लिमिटेड कंपनीला 200 मेगावॅट क्षमतेचे पवन ऊर्जा प्रकल्प उभारण्याचे काम मिळाले आहे. या प्रोजेक्टचे एकूण मुल्य 1400 कोटी रुपये आहे. आज सोमवार दिनांक 20 नोव्हेंबर 2023 रोजी एसजेव्हीएन लिमिटेड कंपनीचे शेअर 0.33 टक्के वाढीसह 76.45 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

एसजेव्हीएन लिमिटेड कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, हा नवीन प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर त्यातून 482 दशलक्ष युनिट ऊर्जा निर्मिती केली जाणार आहे. हा प्रकल्प 25 वर्षांसाठी कार्यान्वित असेल. या प्रकल्पातून एकूण 12,050 युनिट्स वीज निर्मिती केली जाणार आहे.

मागील 6 महिन्यांत एसजेव्हीएन लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 109 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 6 महिन्यांत एसजेव्हीएन लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहेत.

एक वर्षभरापूर्वी ज्या गुंतवणूकदारांनी एसजेव्हीएन लिमिटेड कंपनीचे शेअर खरेदी केले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य 113 टक्क्यांनी वाढले आहेत. एसजेव्हीएन लिमिटेड कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 83.69 रुपये होती. तर नीचांक पातळी किंमत 30.39 रुपये होती. सप्टेंबर 2023 मध्ये एसजेव्हीएन लिमिटेड कंपनीच्या प्रवर्तकांनी 81.85 टक्के भाग भांडवल धारण केले होते. एसजेव्हीएन लिमिटेड कंपनीचे एकूण बाजार भांडवल 29,901 कोटी रुपये आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | SJVN Share Price NSE 20 November 2023.

हॅशटॅग्स

SJVN Share price(17)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x