27 July 2024 4:40 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Gratuity on Salary | खुशखबर! 35 हजार पगार असणाऱ्या खाजगी नोकरदारांना ग्रॅच्युइटी इतकी रक्कम मिळणार Railway Ticket Booking | रेल्वे प्रवाशांनो! जनरल कोट्यातून लोअर बर्थ सीट मिळवता येईल, माहित असणं गरजेचं आहे EPF Pension Money | 90% पगारदारांना माहित नाही, EPFO कडून 7 प्रकारच्या पेन्शन मिळतात, फायद्याची अपडेट Lakshmi Narayan Rajyog | लक्ष्मी-नारायण योग 'या' 3 राशींसाठी ठरणार अत्यंत शुभ, आर्थिक नशीब उजळवणार FD Investment Money | 1 वर्षाच्या रु.1,50,000 FD वर कोण अधिक रक्कम देईल? SBI, पोस्ट ऑफिस, HDFC की ICICI? Gold Rate Today | खुशखबर! सोनं खरेदीची योग्य वेळ, आज सोनं 5149 रुपयांनी स्वस्त झालं, भाव धडाम झाले Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांच्या खात्यात दर महिना रु.20,050 येतील, महिना खर्चाची चिंता मिटेल
x

Tata Investment Share Price | मार्ग श्रीमंतीचा! दोन दिवसात 33 टक्के परतावा दिला टाटा इन्व्हेस्टमेंट शेअरने, वेळीच एंट्री घेणार?

Tata Investment Share Price

Tata Investment Share Price | शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीने व्यवस्थापनातील बदलां संबंधित माहिती सेबीला कळवली आहे. यामुळे टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन कंपनीचे शेअर्स जबरदस्त तेजीत वाढत आहेत.

शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन कंपनीचे शेअर्स 20 टक्क्यांच्या अप्पर सर्किटसह 3905.15 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज देखील या कंपनीचे शेअर्स जबरदस्त तेजीत वाढत आहेत. आज सोमवार दिनांक 20 नोव्हेंबर 2023 रोजी टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन कंपनीचे शेअर्स 13.33 टक्के वाढीसह 4,430.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन कंपनीने सेबीला कळवले की, कंपनीच्या संचालक मंडळाने वैभव गोयल यांना महाव्यवस्थापक म्हणून नियुक्त केले आहे. वैभव गोयल यांना 15 वर्ष कामाचा अनुभव असून ते चार्टर्ड अकाउंटंट आहेत. टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन कंपनीचे शेअर्स वाढण्याचे दुसरे कारण म्हणजे टाटा टेक्नॉलॉजी कंपनीचा आयपीओ लवकरच शेअर बाजारात लाँच होणार आहे. या कंपनीचा हा IPO 22 नोव्हेंबर रोजी गुंतवणुकीसाठी खुला केला जाईल.

चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन कंपनीने 90.94 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. वार्षिक आधारावर पाहिले तर टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन कंपनीच्या महसुलात 29.2 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे.

सप्टेंबर 2023 तिमाहीच्या शेअर होल्डिंग डेटानुसार टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन कंपनीचे बहुतांश शेअर्स प्रवर्तकांनी धारण केले आहे. परकीय गुंतवणूकदारांनी या कंपनीचे 1.12 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. मागील 6 महिन्यांत टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 84 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Tata Investment Share Price NSE 20 November 2023.

हॅशटॅग्स

Tata Investment Share Price(11)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x