
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. सध्या या कंपनीच्या शेअरने आपली मजबूत प्रतिकार पातळी ओलांडली आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 17.43 रुपये होती. तर आज या स्टॉकने आपली नवीन उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली आहे. 2010 नंतर पहिल्यांदाच हा स्टॉक या किमतीच्या पार गेला आहे. आज बुधवार दिनांक 24 जुलै 2024 रोजी सुझलॉन एनर्जी स्टॉक 5.00 टक्के वाढीसह 60.72 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. ( सुझलॉन एनर्जी कंपनी अंश )
2008 नंतर सुझलॉन एनर्जी कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना एकदाही डिव्हीडंट वाटप केलेले नाही. एकेकाळी कर्जाच्या डोंगराखाली दबलेली सुझलॉन एनर्जी कंपनी आता कर्जमुक्त झाली आहे. या कंपनीचे शेअर्स आपल्या गुंतवणूकदारांना भरघोस कमाई करून देत आहेत.
ब्रोकरेज फर्म आनंद राठीच्या तज्ञांच्या मते, हा स्टॉक पुढील काळात आणखी वाढू शकतो. यासाठी तज्ञांनी सुझलॉन एनर्जी स्टॉकवर BUY रेटिंग देऊन गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. या दिग्गज ब्रोकरेज हाऊसने सुझलॉन एनर्जी स्टॉकवर 58 रुपये टार्गेट प्राइस जाहीर केली होती, ती स्टॉकने आज हीट केली आहे.
आईसीआईसीआई सिक्योरिटीज फर्मने देखील सुझलॉन एनर्जी स्टॉकवर 60 रुपये टारगेट प्राइस निश्चित केली होती. जी शेअरने आज ओलांडली आहे. तसेच मॉर्गन स्टेनली फर्मने या स्टॉकवर 58.5 रुपये टार्गेट प्राइस जाहीर केली होती. या कंपनीच्या प्रवर्तकांनी कंपनीचे 15 टक्केपेक्षा कमी भागभांडवल धारण केले आहे. तर सार्वजनिक गुंतवणूकदारांनी या कंपनीचे 56 टक्के भागभांडवल धारण केले आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 181 टक्के वाढली आहे. गेल्या 6 महिन्यांत हा स्टॉक 31.80 टक्के मजबूत झाला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.