 
						Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्समध्ये कमालीची खरेदी पाहायला मिळत आहे. गुरुवारी देखील हा स्टॉक 5 टक्के अप्पर सर्किटसह 63.74 रुपये किमतीवर पोहचला होता. बुधवारी आणि मंगळवारीही हा स्टॉक अप्पर सर्किटमध्ये अडकला होता. सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना प्रचंड नफा कमावून दिला आहे. ( सुझलॉन एनर्जी कंपनी अंश )
जून 2024 तिमाहीत या कंपनीच्या निव्वळ नफ्यात मागील वर्षीच्या तुलनेत 200 टक्के वाढ झाली आहे. जून तिमाहीत या कंपनीने 302 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. या कंपनीकडे 30 जून 2024 पर्यंत 1,197 कोटी रुपये निव्वळ रोख होती. आज शुक्रवार दिनांक 26 जुलै 2024 रोजी सुझलॉन एनर्जी स्टॉक 1.27 टक्के वाढीसह 62.25 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
जून 2024 तिमाहीच्या अखेरीस सुझलॉन एनर्जी कंपनीच्या ऑर्डर बुकचा आकार 3.8 गिगावॅट होता. ब्रोकरेज फर्म जेएम फायनान्शिअलने सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सवर 71 रुपये टार्गेट प्राइस जाहीर केली आहे. 2024 या वर्षात सुझलॉन एनर्जी स्टॉक 65 टक्के वाढला आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 234 टक्के परतावा कमावून दिला आहे.
मागील पाच वर्षांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 1400 टक्के नफा कमावून दिला आहे. या काळात हा स्टॉक 4 रुपयेवरून वाढून सध्याच्या किमतीवर पोहचला आहे. सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 63.74 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 17.43 रुपये होती.
सुझलॉन एनर्जी कंपनीचे एकूण बाजार भांडवल 85,618.77 कोटी रुपये आहे. नुवामा इन्स्टिट्यूशनल इक्विटीज फर्मने जून 2024 तिमाहीच्या निकालांमध्ये जबरदस्त कामगिरी केली आहे. या कंपनीच्या ऑपरेटिंग मार्जिनमध्ये अपेक्षेपेक्षा अधिक वाढ झाली असून करेत्तर नफ्यात वार्षिक 3x ची वाढ झाली आहे. नुवामा इन्स्टिट्यूशनल इक्विटीज फर्मने या स्टॉकवर 64 रुपये टारगेट प्राइस जाहीर केली आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		