4 May 2024 1:58 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीचा मोठा निर्णय, 1 वर्षात 414% परतावा देणारा स्टॉक कोसळणार की तेजीत येणार? Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजी शेअर पुढे किती फायद्याचा ठरणार? तेजीत येणार? Buy करावा की Sell? Yes Bank Share Price | येस बँकेच्या शेअरची घसरण थांबेना! स्टॉक नेमका घसरतोय का? तपशील जाणून घ्या Penny Stocks | कुबेर पैशाचा पाऊस पाडतोय या 10 पेनी शेअर्समधून! 1 दिवसात 40 टक्केपर्यंत परतावा, खरेदी करणार? Infosys Share Price | इन्फोसिस, Wipro, TCS आणि HCL शेअर्सबाबत तज्ज्ञांची भविष्यवाणी, 4 IT शेअर्स मालामाल करणार? Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव धडाम झाला, अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त झालं, नवे दर तपासा Mahindra XUV700 | महिंद्राची नवी SUV भारतात लाँच, मिळणार जबरदस्त एक्सटीरियर आणि इंटिरिअर
x

Aarti Surfactants Share Price | जबरदस्त परतावा देणाऱ्या कंपनीचे शेअर्स स्वस्तात घेण्याची संधी, राइट्स इश्यू रेकॉर्ड डेट?

Aarti Surfactants Share Price

Aarti Surfactants Share Price | आरती सर्फेक्टंट्स लिमिटेड कंपनीच्या शेअर धारकांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे. या कंपनीच्या संचालक मंडळाने राइट्स इश्यूची रेकॉर्ड तारीख जाहीर केली आहे. राइट्स इश्यू मध्ये कंपनी फ्रेश शेअर्स जारी करताना आपल्या विद्यमान शेअर धारकांना प्राधान्य देते. राइट्स इश्यूमध्ये गुंतवणूकदारांना फ्रेश शेअर्स स्वस्त किमतीत खरेदी करता येतात. याचा दीर्घ कालीन फायदा शेअर धारकांना मिळतो. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Aarti Surfactants Share Price | Aarti Surfactants Stock Price | BSE 543210 | NSE AARTISURF)

राइट्स इश्यू डिटेल्स :
1) कंपनीने राइट इश्यू अंतर्गत 8,92,291 शेअर्स 555 रुपये किमतीसाठी जारी केले आहेत. कंपनीने पात्र गुंतवणूकदारांमार्फत 49,52,21,505 रुपये भांडवल उभारण्यासाठी राइट्स इश्यू जारी केला आहे.
2) राइट्स इश्यूची रेकॉर्ड तारीख 17 जानेवारी 2023 रोजी निश्चित करण्यात आली आहे.
3) राइट्स इश्यूमध्ये कंपनी आपल्या पात्र गुंतवणूकदारांना 17 शेअर्सवर 2 शेअर्स स्वस्तात खरेदी करण्याची संधी देणार आहे.
4) राइट्स इश्यूची किंमत 555 रुपये निश्चित केली आहे.
5) राइट इश्यू गुंतवणुकीसाठी खुला होण्याची तारीख 25 जानेवारी 2023 असेल.
6) 3 फेब्रुवारी 2023 रोजी राइट्स इश्यू बंद होईल.

शेअरची वाटचाल :
शुक्रवार दिनांक 13 जानेवारी 2023 रोजी ‘आरती सर्फेक्टंट्स लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स NSE इंडेक्सवर 0.45 टक्के वाढीसह 644.75 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. कंपनीचे शेअर्स 14 जुलै 2020 रोजी शेअर्स बाजारात लिस्ट झाला होता. लिस्टिंगपासून आतापर्यंत या कंपनीचे शेअर्स 55.63 टक्क्यांनी वधारले आहेत. 17 जानेवारी 2022 रोजी आरती सर्फेक्टंट्स लिमिटेड कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 1074.80 रुपये होती. तर या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 596.10 रुपये होती. सप्टेंबर 2022 च्या तिमाहीत या कंपनीच्या भाग भांडवलात प्रवर्तकांचा वाटा 45.04 टक्के होता. तर किरकोळ गुंतवणूकदारांचा वाटा 54.96 टक्के होता.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Aarti Surfactants Share Price 543210 AARTISURF in focus check details 13 January 2023.

हॅशटॅग्स

#Multibagger Stock(577)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x