
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सुरुवातीच्या काही तासात 1 टक्क्यांच्या घसरणीसह 44.90 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज गुरुवारी देखील हा स्टॉक किंचित घसरणीसह ट्रेड करत आहे. ( सुझलॉन एनर्जी कंपनी अंश )
सुझलॉन एनर्जी कंपनी मुख्यतः पवन उर्जा निर्मिती क्षेत्रात व्यवसाय करते. ही कंपनी पवन ऊर्जा टर्बाइनमधून वीज निर्मितीवर अधिक लक्ष देते. या कंपनीची स्थापना 1995 साली झाली होती. आज गुरूवार दिनांक 30 मे 2024 रोजी सुझलॉन एनर्जी स्टॉक 0.65 टक्के घसरणीसह 45.80 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
शेअर मार्केट ब्रोकरेज फर्म आनंद राठीच्या तज्ञांनी सुझलॉन एनर्जी स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. या कंपनीच्या शेअर्सने मागील काही वर्षात जबरदस्त कामगिरी केली आहे. सध्या ही कंपनी पूर्णपणे कर्जमुक्त झाली आहे. मार्च तिमाहीत सुझलॉन एनर्जी कंपनीच्या एकत्रित एकूण उत्पन्नात 40.63 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे. म्हणजेच कंपनीने मार्च तिमाहीत 2207.43 कोटी रुपये महसूल संकलन केले आहे. याच तिमाहीत कंपनीने 254.2 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे.
सुझलॉन एनर्जी कंपनीच्या लेटेस्ट शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार, कंपनीच्या प्रवर्तकांनी कंपनीचे 13.29 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. तर देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी या कंपनीचे 3.61 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. विदेशी गुंतवणूकदारांनी सुझलॉन एनर्जी कंपनीचे एकूण 19.57 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. सुझलॉन एनर्जी कंपनी या स्मॉल कॅप कंपनीचे एकूण बाजार भांडवल 61529.35 कोटी रुपये आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.