
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स मजबूत तेजीत वाढत आहेत. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या अप्पर सर्किटसह 27.11 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज देखील या कंपनीचे शेअर्स जबरदस्त तेजीत वाढत आहेत. मागील साडेतीन वर्षांत सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 1.72 रुपयेवरून वाढून 27 रुपये किमतीवर पोहचले आहेत. Suzlon Energy Share Price
सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सने आपली 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत स्पर्श केली आहे. सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 6.60 रुपये होती. आज बुधवार दिनांक 4 ऑक्टोबर 2023 रोजी सुझलॉन एनर्जी स्टॉक 2.60 टक्के वाढीसह 27.65 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
मागील काही वर्षात सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 1475 टक्के परतावा कमावून दिला आहे. 27 मार्च 2020 रोजी सुझलॉन एनर्जी कमीचे शेअर्स 1.72 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 3 ऑक्टोबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 27.11 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
मागील साडेतीन वर्षांत सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 1475 टक्के परतावा कमावून दिला आहे. जर तुम्ही 27 मार्च 2020 रोजी सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते तर अजा तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 15.76 लाख रुपये झाले असते.
सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सने मागील 6 महिन्यांत आपल्या गुंतवणुकदारांना 235 टक्के परतावा कमावून दिला आहे. 3 एप्रिल 2023 रोजी सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 8.09 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 3 ऑक्टोबर 2023 रोजी सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 27.11 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. 2023 या वर्षात सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 153 टक्के नफा कमावून दिला आहे.
मागील एका वर्षभरात या कंपनीच्या शेअरची किंमत 244 टक्के वाढली आहे. 3 ऑक्टोबर 2022 रोजी सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 7.89 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 36800 कोटी रुपये आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.