
Suzlon Share Price | एक वेळ अशी होती की, सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 5 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. त्यानंतर कंपनीने स्वतःला कर्ज मुक्त केले. आणि सुझलॉन एनर्जी स्टॉक वाढू लागला. सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स अमाप कर्ज्याच्या बोझ्याखाली दबले होते. आता कंपनी कर्जमुक्त होण्याच्या मार्गावर आली आहे आणि कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांचा विश्वास जिंकण्यास सुरुवात केली आहे.
सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सनी मागील 3 महिन्यांत आपल्या शेअर धारकांची गुंतवणूक दुप्पट केली आहेत. आज मंगळवार दिनांक 5 सप्टेंबर 2023 रोजी सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 1.87 टक्के घसरणीसह 23.65 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
जर आपण सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरचे प्रॉफिट चार्ट पाहिले तर आपल्याला समजेल की, अलीकडच्या काळात सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना चांगली कमाई करून दिली आहे. ऑगस्ट 2023 मध्ये या एकाच महिन्यात सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सने लोकांना 29.53 टक्के नफा मिळवून दिला आहे.
मागील 3 महिने ते 3 वर्षांपासून मल्टिबॅगर परतावा
पहिल्या 3 महिन्यांत सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरची किंमत 124.22 टक्के वाढली आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरची किंमत 184.09 टक्के वाढली आहे. मागील 3 वर्षात सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरचे मूल्य पाच पट वाढले आहे. आणि 3 वर्षात सुझलॉन एनर्जी शेअर्सने लोकांना 584.93 टक्के नफा कमावून दिला आहे.
कंपनीला विविध ऑर्डर्स मिळाल्या
सुझलॉन एनर्जीने नुकताच भांडवल उभारणी केली असून कंपनीने पूर्णपणे कर्जमुक्त झाल्याची घोषणा केली आहे. याशिवाय सुझलॉन एनर्जी कंपनीला जागतिक आणि स्वदेशी बाजारातून विविध ऑर्डर्स देखील मिळाल्या आहेत. अशा परिस्थितीत सुझलॉन एनर्जी कंपनी पुढील काळात आणखी चांगली कामगिरी करेल, असा विश्वास तज्ञांनी व्यक्त केला आहे.
तज्ज्ञांकडून शेअर्स खरेदीचा सल्ला – टार्गेट प्राईस जाहीर
ब्रोकरेज हाऊस कंपनी जेएम फायनान्शियलने सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याची शिफारस केली आहे. तज्ञांनी या स्टॉकवर 30 रुपये लक्ष किंमत जाहीर करून गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. पुढील काळात सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 38 टक्के नफा कमावून देऊ शकतात. एंजल वन फर्मने सुझलॉन एनर्जी स्टॉक 22 रुपये ते 22.5 रुपये किंमत श्रेणीत खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. आणि स्टॉकवर 27 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.