 
						Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी या रिन्यूएबल एनर्जी क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीचे शेअर्स अप्पर सर्किट तोडत आहेत. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनीचे शेअर्स 5 टक्केचा अप्पर सर्किट तोडून 19.56 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. आज देखील हा स्टॉक 5 टक्के अप्पर सर्किटमध्ये अडकला आहे. 25 जुलै 2023 रोजी सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 20.80 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते.
आज हा स्टॉक आपल्या उच्चांक किंमत पातळीजवळ ट्रेड करत आहे. नुकताच या कंपनीने भांडवल उभारणीची योजना आखली होती, या वृत्तानंतर गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात स्टॉक खरेदीला सुरुवात केली. आज गुरूवार दिनांक 10 ऑगस्ट 2023 रोजी सुझलॉन एनर्जी स्टॉक 4.87 टक्के वाढीसह 20.45 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
काही महिन्यापूर्वी सुझलॉन एनर्जी कंपनीला QIP द्वारे भांडवल उभारण्यासाठी शेअर धारकांनी मान्यता दिली होती. सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सनी मागील एका वर्षाच्या कालावधीत आपल्या शेअर धारकांना 177 टक्के नफा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअरने मागील सहा महिन्यांत आणि तीन महिन्यांत गुंतवणुकदारांना तिहेरी अंकी परतावा कमावून दिला आहे. YTD आधारे या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 83 टक्के परतावा कमावून दिला आहे.
जून 2023 तिमाहीच्या कामगिरीत थोडी निराशा पाहायला मिळत आहे, कारण कंपनीचा तिमाही नफा किंचित घटला आहे. जून 2023 तिमाहीत सुझलॉन एनर्जी कंपनीच्या नफ्यात 96 टक्क्यांची घट झाली असून कंपनीने 101 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. मागील वर्षी याच तिमाहीत सुझलॉन एनर्जी कंपनीने 2,433 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. जून 2023 तिमाहीत सुझलॉन एनर्जी कंपनीने 1,348 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. तर मागील मागील वर्षी याच तिमाहीत कंपनीने 1,378 कोटी रुपये महसूल संकलित केला होता.
प्रभुदास लिलाधर फर्मच्या तज्ञांच्या मते, सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरने 8 रुपये किंमत पातळीवरून जबरदस्त उसळी नोंदवली आहे. नुकताच हा स्टॉक 20.80 रुपये या उच्चांक किंमत पातळीवर पोहोचला होता. शेअर बाजारातील तज्ज्ञांच्या मात्र अल्पकाळात हा स्टॉक 26 रुपये किमतीवर जाऊ शकतो. आणि त्यानंतर पुढील टप्पा हा 34 रुपये असेल. प्रवीण इक्विटीज फर्मच्या तज्ञाच्या मते, सुझलॉन एनर्जी कंपनीवर सध्या कमी कर्ज असूनही कंपनीला मोठ्या आव्हानांना तोंड द्यावे लागत आहे. मात्र तज्ञांनी या स्टॉकवर 21 रुपये लक्ष किमतीसाठी गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		