 
						Suzlon Share Price | मंगळवार 17 डिसेंबर 2024 रोजी स्टॉक मार्केटमध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली होती. मंगळवारी स्टॉक मार्केटमध्ये इतकी घसरण झाली की, शुक्रवारची सपोर्ट लेव्हल सुद्धा तुटली आहे. मात्र मंगळवारच्या घसरणीतही सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनीच्या शेअरमध्ये 4.99 टक्क्यांची तेजी दिसून आली. (सुझलॉन एनर्जी कंपनी अंश)
सुझलॉन शेअरची सध्याची स्थिती
मंगळवारी सुझलॉन लिमिटेड कंपनी शेअर प्राईसने ५ टक्क्यांनी वाढून अप्पर सर्किट रेंजला स्पर्श केला होता आणि 69.67 रुपयांवर पोहोचला. सध्या सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनीचे मार्केट कॅप 93,999 कोटी आहे. सुझलॉन एनर्जी कंपनी शेअरने सप्टेंबर २०२४ मध्ये ८६.०४ रुपयांचा नवा उच्चांक गाठला होता. मात्र, त्यानंतर नोव्हेंबर २०२४ मध्येच सुझलॉन एनर्जी शेअर ५४ रुपयांच्या नीचांकी पातळीवर पोहोचला होता.
कंपनी जवळपास कर्जमुक्त
मात्र सुझलॉन लिमिटेड कंपनी शेअर घसरणीच्या टप्प्यात असतानाही तज्ज्ञांनी खरेदीचा सल्ला दिला होता. कारण सुझलॉन लिमिटेड कंपनी सातत्याने कर्ज कमी करून जवळपास कर्जमुक्त झाली होती. आता सुझलॉन शेअर पुन्हा वाढून ७० रुपयांच्या पातळीच्या जवळ पोहोचला आहे.
आगामी तिमाही आर्थिक निकाल
सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनी ३१ डिसेंबर २०२४ रोजी संपलेल्या तिमाहीत सुद्धा सकारात्मक आर्थिक निकाल देईल, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनीची कमाई सातत्याने सुधारत आहे. सुझलॉन एनर्जी कंपनीचा परतावा ऑन इक्विटी रेशो २८.८०% आहे. गेल्या ५ वर्षांत सुझलॉन एनर्जी कंपनीने १९.७% CAGR’ची चांगली नफा वाढ नोंदवली आहे. सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनीची स्थिती बदलली असून ती केवळ नफ्यात असलेली कंपनीच नव्हे, तर कर्जमुक्त कंपनीही बनली आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		