
Sylph Technologies Share Price | सिल्फ टेक्नॉलॉजी या ऑफिस आणि आउटसोर्सिंग सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, आउटसोर्सिंग कस्टम अॅप्लिकेशन डेव्हलपमेंट, आउटसोर्स्ड प्रॉडक्ट डेव्हलपमेंट, ई-कॉमर्स आणि वायरलेस मोबाइल सोल्यूशन्स संबंधित सेवा प्रदान करणाऱ्या कंपनीबाबत एक मोठी बातमी आली आहे. सोमवार दिनांक 14 ऑगस्ट 2023 रोजी सिल्फ टेक्नॉलॉजी कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक पार पडली होती. या बैठकीत कंपनीच्या संचालकांनी आपल्या दीर्घकालीन व्यवसाय योजनेचा भाग म्हणून उत्पादन लाइनची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
सिल्फ टेक्नॉलॉजीज ही कंपनी नवीन व्यावसायिक प्रस्ताव आणि कंपन्यांची खरेदी करून नवीन व्यावसायिक संधी शोधण्याचा प्रयत्न करणार आहे. याबाबत देखील विस्तारपूर्वक चर्चा संचालक मंडळाच्या बैठकीत झाली आहे. गुरूवार दिनांक 17 ऑगस्ट 2023 रोजी सिल्फ टेक्नॉलॉजीज कंपनीचे शेअर्स 0.31 टक्के वाढीसह 3.20 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
भारतीय देशांतर्गत बाजारपेठेत आणि जागतिक बाजारपेठेत सध्या मंदीचे सावट पसरले आहे. सध्याची परिस्थिती पाहता सिल्फ टेक्नॉलॉजी कंपनीने विपरीत परिणाम टाळण्यासाठी एक तज्ज्ञांची समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या जगभरात व्यवसाय मंदावला आहे. आयटी कंपन्यांच्या चिंतेत देखील कमालीची भर पडली आहे.
आता जगभरातील सर्व कंपन्यांचे लक्ष भारतासारख्या वाढत्या अर्थव्यवस्थेकडे लागले आहे. सिल्फ टेक्नॉलॉजी कंपनीने भांडवल उभारण्यासाठी 26 कोटीचे पूर्ण परिवर्तनीय वॉरंट करणार आहे. ही कंपनी 3.20 रुपये प्रति शेअर या किमतीवर प्राधान्याच्या आधारावर वॉरंट जारी करून भांडवल उभारणी करणार आहे.
सिल्फ टेक्नॉलॉजी कंपनीने आपल्या संचालक मंडळाच्या बैठकीत UIP, ADR, GDR, FCCB किंवा इतर कोणत्याही मार्गाने किमान 100 कोटी रुपये भांडवल जमा करण्याची तयारी केली आहे. सर्व आवश्यक निर्णय घेण्यासाठी आणि भांडवल उभारणीमध्ये येणारे अडथळे दूर करण्यासाठी कंपनीने निधी उभारणी समितीची स्थापना केली आहे.
सिल्फ टेक्नॉलॉजी कंपनीच्या संचालक मंडळाने कंपनीचे अधिकृत भाग भांडवल 15 कोटी रुपयेवरून वाढवून 100 कोटी करण्याचा निर्णय घेतला आहे. 9 डिसेंबर 2021 रोजी सिल्फ टेक्नॉलॉजीज कंपनीचे शेअर्स 26 पैशावर ट्रेड करत होते. या किमतीपासून गुंतवणूकदारांनी 15 पट अधिक नफा कमावला आहे. सिल्फ टेक्नॉलॉजी कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 5.30 रुपये होती. तर नीचांक पातळी किंमत 1.12 रुपये होती.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.