 
						TAC Infosec Share Price | टीएसी इन्फोसेक कंपनीचा IPO 20 दिवसांपूर्वीच शेअर बाजारात लाँच करण्यात आला होता. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 10 टक्क्यांच्या वाढीसह 530.05 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज या स्टॉकमध्ये नफा वसुली पाहायला मिळत आहे. या कंपनीचा IPO स्टॉक 106 रुपये किमतीवर लाँच करण्यात आला होता. या कंपनीचे शेअर्स 5 एप्रिल 2024 रोजी शेअर बाजारात सूचीबद्ध झाले होते. ( टीएसी इन्फोसेक कंपनी अंश )
शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार विजय केडिया यांनी देखील टीएसी इन्फोसेक कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक केली होती. आज शुक्रवार दिनांक 26 एप्रिल 2024 रोजी टीएसी इन्फोसेक कंपनीचे शेअर्स 4.54 टक्के घसरणीसह 506 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार विजय केडिया यांनी टीएसी इन्फोसेक कंपनीचा आयपीओ येण्याआधीच गुंतवणूक केली होती. या कंपनीचे शेअर्स अवघ्या 20 दिवसांत 400 टक्के मजबूत झाले आहेत. 27 मार्च 202 रोजी या कंपनीचा IPO सबस्क्रिप्शनसाठी खुला करण्यात आला होता. या कंपनीचे शेअर्स 5 एप्रिल 2024 रोजी शेअर बाजारात 290 रुपये किमतीवर सूचीबद्ध झाले होते. 25 एप्रिल 2024 रोजी टीएसी इन्फोसेक कंपनीचे शेअर्स 530.05 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
विजय केडिया यांनी टीएसी इन्फोसेक कंपनीचे 15 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. टीएसी इन्फोसेक कंपनीचे प्रवर्तक तृष्णीत अरोरा आणि चरणजीत सिंग आहेत. टीएसी इन्फोसेक या कंपनीचे संस्थापक आणि CEO त्रिशनीत अरोरा आहेत. त्यांनी या कंपनीचे 74 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. आणि चरणजीत सिंग यांनी कंपनीचे 5 टक्के भाग भांडवल धारण केले आहेत. टीएसी इन्फोसेक कंपनीचा IPO एकूण 422.03 पट अधिक सबस्क्राइब झाला होता. किरकोळ गुंतवणूकदारांचा राखीव कोटा एकूण 433.80 पट अधिक सबस्क्राइब झाला होता. तर गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारांचा राखीव कोटा 768.89 पट अधिक सबस्क्राईब झाला होता.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		