
Tanla Share Price | तानला प्लॅटफॉर्म लिमिटेड कंपनीच्या शेअरमध्ये कमालीची उलाढाल पाहायला मिळत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये तानला प्लॅटफॉर्म लिमिटेड कंपनीचे शेअर्स 20 टक्के वाढीसह 1,110.50 रुपये किमतीवर पोहचले होते. मात्र आज या कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त नफा वसुली पाहायला मिळाली आहे.
तानला प्लॅटफॉर्म लिमिटेड कंपनीचे शेअर्स सध्या 1,317.70 रुपये या वार्षिक उच्चांक किंमत पातळीच्या 15.72 टक्के खाली ट्रेड करत आहेत आणि 506.10 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीपेक्षा 119.42 टक्के वर ट्रेड करत आहेत. आज गुरूवार दिनांक 14 डिसेंबर 2023 रोजी तानला प्लॅटफॉर्म लिमिटेड कंपनीचे शेअर्स 2.01 टक्के घसरणीसह 1,069.00 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
तानला प्लॅटफॉर्म लिमिटेड कंपनीच्या स्टॉकने 935 रुपये आणि 1,040 रुपये या किमतीवर बॅक टू बॅक टेक्निकल ब्रेकआउट दिले आहेत. मागील काही आठवड्यापासून या कंपनीचे स्टॉक बेस बिल्डिंग मोडमध्ये ट्रेड करत होते. आणि 930 रुपयेच्या वर गेल्यानंतर शेअर डाउनट्रेंडमध्ये जाणार असल्याचे तज्ञांनी सांगितले होते. सध्या तानला प्लॅटफॉर्म लिमिटेड कंपनीचे शेअर्स टेक्निकल चार्टवर मजबूत स्थितीत पाहायला मिळत आहे. पुढील काळात हा स्टॉक 1,150 रुपये ते 1,200 रुपये दरम्यान ट्रेड करू शकतो, असे तज्ञ म्हणाले.
गुंतवणूक सल्लागारांनी नवीन खरेदीदारांना तानला प्लॅटफॉर्म लिमिटेड कंपनीच्या शेअर्सवर ‘बाय ऑन डिप्स’ चा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, तानला प्लॅटफॉर्म लिमिटेड कंपनीचे शेअर्स जवळपास चार महिन्यांनंतर बेस बिल्डिंग मोडमधून बाहेर आले आहेत. बुधवारी हा स्टॉक अचानक 20 टक्क्यांनी वाढला होता. तज्ञांच्या मते, या स्टॉकमध्ये 1125 रुपये किमतीवर आणखी एक ब्रेकआऊट पाहायला मिळू शकतो. गुंतवणूकदारांनी 1150 रुपये आणि 1200 रुपये या टार्गेट प्राइससाठी स्टॉक खरेदी करावा.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.