Taparia Tools Share Price | टपारिया टूल्स शेअर्स गुंतवणुकदारांना मिळणार दुहेरी फायदा, फ्री बोनस शेअर्स आणि डिव्हीडंड कमाईची सुवर्ण संधी

Taparia Tools Share Price | टपारिया टूल्स कंपनीने (Taparia Tools) नुकताच आपल्या पात्र शेअर धारकांना मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. यासोबतच कंपनी आपल्या गुंतवणूकदारांना 77.50 रुपये लाभांश वाटप करणार आहे. म्हणजेच पात्र गुंतवणूकदारांना बंपर परतावा मिळणार आहे. (Taparia Tools Share)

कंपनीने बोनस शेअर्स आणि लाभांश घोषणेची माहिती जाहीर करताच, गुंतवणूकदारांनी स्टॉक खरेदीसाठी तुंबळ गर्दी केली. आज सोमवार दिनांक 26 जून 2023 रोजी टपारिया टूल्स कंपनीचे शेअर्स 11.57 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

बोनस आणि लाभांश रेकॉर्ड तारीख – Taparia Tools Dividend

शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये टपारिया टूल्स कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या अप्पर सर्किटवर ट्रेड करत होते. टपारिया टूल्स कंपनीने सेबीला कळवले आहे की, टपारिया टूल्स कंपनी आपल्या विद्यमान पात्र गुंतवणुकदारांना 1 शेअरवर 4 बोनस शेअर्स वाटप करणार आहे. कंपनीने यासाठी रेकॉर्ड तारीख म्हणून 19 जून 2023 हा दिवस निश्चित केला होता.

त्याच वेळी कंपनीने प्रत्येक शेअरवर 77.50 रुपये म्हणजेच दर्शनी किमतीवर 775 टक्के लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे. आणि लाभांशाची रेकॉर्ड तारीख म्हणून 26 जून 2023 हा दिवस निश्चित करण्यात आला होता. आज या लाभांश वाटपाची रेकॉर्ड तारीख आहे. ही कंपनी आज एक्स डिव्हिडंड स्टॉक म्हणून ट्रेड करेल.

शेअरची कामगिरी – Taparia Share Price

शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये टपारिया टूल्स कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या वाढीसह 11.57 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. टपारिया टूल्स कंपनीच्या शेअरने मागील 6 महिन्यात आपल्या शेअर धारकांना 10.19 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात टपारिया टूल्स कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 15.70 टक्के परतावा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 12.14 रुपये होती.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Taparia Tools Share Price today on 26 June 2023