
Tata Consumer Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा कंझ्युमर कंपनीने कॅपिटल फूड्स आणि ऑरगॅनिक इंडिया कंपनीचे अधिग्रहण पूर्ण केले आहे. या डीलसाठी टाटा कंझ्युमर कंपनीने 6500 कोटी रुपये गुंतवणूक केली आहे. मात्र हा निधी उभारण्यासाठी टाटा कंझ्युमर कंपनी व्यावसायिक बाँड किंवा राइट्स इश्यू जारी करण्याचा विचार करत आहे. या दोन्ही कंपन्यांचे संपादन करण्यासाठी टाटा कंझ्युमर कंपनीच्या संचालक मंडळाने निधी गोळा करण्याच्या प्रक्रियेला शुक्रवारी मंजुरी दिली आहे.
जमा होणाऱ्या निधीतून 6500 कोटी रुपये कॅपिटल फूड्स आणि ऑरगॅनिक इंडिया कंपनीमध्ये भाग भांडवल खरेदी करण्यासाठी खर्च केले जाणार आहेत. शनिवार दिनांक 20 जानेवारी 2024 रोजी शेअर बाजाराच्या विशेष ट्रेडिंग सेशनमध्ये टाटा कंझ्युमर स्टॉक 0.37 टक्के वाढीसह 1,151 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, टाटा कंझ्युमर कंपनी राइट्स इश्यूच्या माध्यमातून 3000 कोटी रुपये भांडवल उभारणी करणार आहे. राइट्स इश्यूमध्ये किंमत, तारीख , कोणत्या प्रमाणात शेअर्स जारी केले जातील याबाबत सविस्तर तपशील कंपनी लवकरच जाहीर करेल. टाटा कंझ्युमर्स लिमिटेड कंपनी कॅपिटल फूड्स कंपनीचे 75 टक्के भाग भांडवल खरेदी करणार आहे. आणि उर्वरित 25 टक्के भाग भांडवल कंपनी पुढील 3 वर्षांत करेल. हा करार 5100 कोटी रुपये मुल्यांत केला जाणार आहे.
यासह टाटा कंझ्युमर कंपनी ऑरगॅनिक इंडिया कंपनीचे 100 टक्के भाग भांडवल 1900 कोटी रुपयेला खरेदी करणार आहे. मागील एका वर्षात टाटा कंझ्युमर कंपनीच्या शेअर्सची किंमत 55 टक्क्यांनी वाढली होती. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 20 टक्के परतावा कमावून दिला आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये टाटा कंझ्युमर कंपनीचे शेअर्स 0.39 टक्क्यांच्या वाढीसह 1151 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.