 
						Tata Elxsi Share Price | टाटा एलेक्सि या टाटा समूहाचा भाग असलेल्या कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त नफा कमावून दिला आहे. याकाळात टाटा एलेक्सि कंपनीचे शेअर्स 90 रुपयेवरून वाढून 7500 रुपयेवर पोहचले आहेत. टाटा एलेक्सि कंपनीने आपल्या आयुष्यकाळात शेअर धारकांना 21,814.29 टक्के परतावा कमावून दिला आहे.
टाटा एलेक्सि कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 10760.40 रुपये होती. तर 52 आठवड्यांची नीचांकी पातळी किंमत 5708.10 रुपये होती. आज शुक्रवार दिनांक 30 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.10 टक्के वाढीसह 7,669.95 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
1 लाखावर दिला 83 लाख परतावा
28 जून 2013 रोजी टाटा एलेक्सि कंपनीचे शेअर्स 90.40 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 28 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 7600 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. या काळात टाटा एलेक्सि कंपनीचे शेअर्स 8307 टक्के वाढले आहेत. जर तुम्ही 10 वर्षांपूर्वी टाटा एलेक्सि कंपनीच्या शेअरमध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 83.79 लाख रुपये झाले असते.
3 वर्षात दिला 745 टक्के परतावा
टाटा एलेक्सि कंपनीच्या शेअरने मागील 3 वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना बंपर परतावा कमावून दिला आहे. 26 जून 2020 रोजी या कंपनीचे शेअर्स 900.20 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. टाटा एलेक्सि कंपनीचे शेअर्स 28 जून 2023 रोजी 7600 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
मागील 3 वर्षात टाटा एलेक्सि कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 745 टक्के परतावा कमावून दिला आहे. जर तुम्ही 3 वर्षांपूर्वी टाटा एलेक्सि कंपनीच्या शेअरमध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 8.44 लाख रुपये झाले असते.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		