 
						Tata Group IPO | सध्या जर तुम्ही शेअर बाजारातील IPO मध्ये गुंतवणूक करून मजबूत कमाई करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. लवकरच टाटा समूहाचा भाग असलेल्या कंपनीचा IPO लाँच होण्याची बातमी मिळत आहे.
टाटा समूह आपल्या वित्त सेवा युनिट असलेल्या टाटा कॅपिटल कंपनीचा आयपीओ लाँच करण्याची तयारी करत आहे. 2024 या वर्षाच्या अखेरीपर्यंत टाटा कॅपिटल कंपनीचे शेअर्स NSE आणि BSE वर सूचीबद्ध केले जातील.
टाटा सन्स या टाटा समूहाच्या होल्डिंग कंपनीने टाटा कॅपिटल या फायनान्स सर्व्हिसेस युनिटचे 95 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. मीडिया रिपोर्टनुसार, टाटा समूहाने टाटा कॅपिटल कंपनीच्या संभाव्य IPO योजनेसाठी बँकर्ससोबत संपर्क साधण्यास सुरुवात केली आहे. टाटा समूह लवकरच टाटा कॅपिटल कंपनीच्या नियोजित IPO साठी भारतातील बँकर्सची निवड करणार आहे.
टाटा समूह 2024 च्या अखेरीस टाटा कॅपिटल कंपनीचा आयपीओ पूर्ण करण्याची योजना आखत आहे. 31 मार्च 2023 पर्यंत टाटा सन्स कंपनीवर 22,000 कोटी रुपयेपेक्षा जास्त कर्ज होते. मागील महिन्यात टाटा सन्स गृपने टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस कंपनीचे 20 दशलक्ष शेअर्स विकून सुमारे 1.1 अब्ज डॉलर्स भांडवल उभारणी केली आहे. टीसीएस कंपनीच्या शेअर्स विक्रीतून जमा केलेली रक्कम टाटा सन्स ग्रुपचा ताळेबंद सुधारण्यासाठी खर्च करण्यात आला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		