 
						Tata Group Shares | जर तुम्ही शेअर बाजाराचे सखोल ज्ञान असलेले ट्रेडर असाल, तर तुम्हाला माहित असेल की टाटा समूहाच्या शेअर बाजारात एकूण 28 कंपन्या सूचिबद्ध आहेत. मागील एका वर्षात टाटा समूहाचा भाग असलेल्या इंडियन हॉटेल्स कंपनी आणि ओरिएंटल हॉटेल्स कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना मजबूत परतावा कमावून दिला आहे. मात्र टाटा समूहाचा भाग असलेल्या एका स्मॉल कॅप कंपनीने ही आपल्या गुंतवणुकदारांना 100 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे.
बनारस हॉटेल्स लिमिटेड कंपनी शेअर
या कंपनीचे नाव आहे, बनारस हॉटेल्स लिमिटेड. या कंपनीच्या शेअरने मागील एका वर्षभरात कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 107.15 टक्के परतावा कमावून दिला आहे. आज मंगळवार दिनांक 6 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.87 टक्के वाढीसह 3,974.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
मागील एका महिन्यात बनारस हॉटेल्स लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 7.54 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर र ज्याने 6 महिन्यांपूर्वी या कंपनीच्या शेअरमध्ये पैसे लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य 34.48 टक्के वाढले आहे. YTD आधारे बनारस हॉटेल्स लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 47.31 टक्के परतावा कमावून दिला आहे.
टाटा ग्रुपचे शेअर्स आणि परतावा
टाटा समूहाचा भाग असलेल्या सुप्रसिद्ध कंपन्यांच्या तुलनेत टाटा ग्रुपच्या स्मॉल कॅप कंपन्याच्या शेअरने लोकांना मालामाल केले आहे. मागील एका वर्षात टाटा मोटर्स कंपनीच्या शेअर्सने गुंतवणूकदारांना 25 टक्के परतावा दिला आहे. टीसीएस कंपनीच्या शेअर्सने फारशी चांगली कामगिरी केली नाही.
इंडियन हॉटेल्स कंपनीच्या शेअरमध्ये 70 टक्के वाढ झाली आहे. टायटन कंपनीच्या शेअर्सच्या किमतीत मागील एका वर्षात 30 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे. टाटा पॉवर कंपनीने मागील एका वर्षात लोकांना 6 टक्के परतावा कमावून दिला आहे.
Disclaimer | म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		