12 October 2024 5:28 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bank FD Interest | 5 वर्षांसाठी केलेली FD 1 वर्षातच तोडायची असल्यास व्याज मिळेल की उलट पैसे कापले जातील No Cost EMI | नो कॉस्ट EMI खरंच फायद्याचा असतो, खरंच फ्री सुविधा मिळते का, असा असतो खेळ - Marathi News Nippon India Small Cap Fund | बापरे, महिना रु.10,000 SIP करा, ही योजना 1 कोटी 53 लाख रुपये परतावा देईल - Marathi News TCS Share Price | टाटा ग्रुपचा IT शेअर देणार मोठा परतावा, TCS स्टॉकची पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TCS Manmauji Movie Release Date | एका तरुणासाठी स्त्रियांना झालंय प्रेमाचं लागीर, 'मनमौजी' सिनेमाची रिलीज डेट जाहीर IREDA Share Price | PSU IREDA शेअर फोकसमध्ये, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग - NSE: IREDA Apollo Micro Systems Share Price | डिफेंस क्षेत्रातील शेअर रॉकेट तेजीत परतावा देणार, फायद्याची अपडेट - NSE: APOLLO
x

Zomato Share Price | झोमॅटो शेअरने 3 महिन्यात 50% परतावा दिला, तेजी अजून वाढणार? स्टॉक डिटेल्स पहा

Highlights:

  • Zomato Share Price
  • स्टॉक इश्यू किमतीच्या खाली येऊन रु.40 किमतीवर आला होता
  • झोमॅटो स्टॉक बाबत तज्ज्ञांचे मत
  • Zomato शेअर किंमत
  • झोमॅटो IPO तपशील
Zomato Share Price

Zomato Share Price | ऑनलाइन फूड डिलिव्हरी कंपनी झोमॅटो कंपनीचे शेअर्स मार्च 2023 पासून आतापर्यंत 50 टक्क्यांनी मजबूत झाले आहेत. झोमॅटो कंपनीचे शेअर्स लिस्टिंग झाल्यानंतर तेजीत वाढले होते, मात्र त्या नंतर स्टॉकमध्ये विक्रीचा दबाव वधू लागला.

स्टॉक इश्यू किमतीच्या खाली येऊन रु.40 किमतीवर आला होता

एक वर्षभरापूर्वी झोमॅटो स्टॉक 76 रुपये या आपल्या इश्यू किमतीच्या खाली येऊन 40 रुपये किमतीवर आला होता. 7 जून 2026 रोजी झोमॅटो कंपनीचे शेअर्स 74 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज शुक्रवार दिनांक 9 जून 2023 रोजी झोमॅटो कंपनीचे शेअर्स 2.18 टक्के वाढीसह 77.45 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

झोमॅटो स्टॉक बाबत तज्ज्ञांचे मत

मॉर्गन स्टॅनली फर्मने झोमॅटो स्टॉकवर ओव्हरवेट रेटिंग देऊन 85 रुपये लक्ष किंमत निश्चित केली आहे. झोमॅटो कंपनीचा IPO 23 जुलै 2021 रोजी शेअर बाजारात लाँच करण्यात आला होता. तर 76 रुपये या इश्यू किमतीच्या तुलनेत झोमॅटो स्टॉक 116 रुपये किमतीवर सूचीबद्ध झाला होता.

16 नोव्हेंबर 2021 रोजी झोमॅटो कंपनीचे शेअर्स 169 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. जुलै 2022 मध्ये झोमॅटो शेअर 40 रुपये किमतीवर आला होता. तर 1 जून 2022 नंतर झोमॅटो स्टॉकची किंमत प्रथमच 76 रुपये किमतीवर आली होती.

Zomato शेअर किंमत
* IPO इश्यू किंमत : 76 रुपये
* जुलै 23, 2021 : 125 रुपये
* नोव्हेंबर 16, 2021 : 169 रुपये
* जुलै 27, 2022 : 40.6 रुपये
* आजची किंमत : 77.45 रुपये

झोमॅटो IPO तपशील :
* झोमॅटो कंपनीच्या IPO मध्ये स्टॉक ला खालील प्रमाणे प्रतिसाद मिळाला होता.
* QIB : 52x
* NII : 33x
* किरकोळ : 7.5x
* एकूण : 38x

अलिबाबा ग्रुप, उबेर, टायगर ग्लोबल यांनी झोमॅटो कंपनीचे शेअर्स मोठ्या प्रमाणात विकले आहेत. झोमॅटो कंपनीने ऑगस्ट 2022 मध्ये ब्लिंकिटचे अधिग्रहण केले होते. तर झोमॅटो कंपनीच्या दिग्गज अधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा राजीनामा देखील दिला होता.

त्यामूळे Zomato कंपनीच्या आर्थिक कामगिरीत बदल पाहायला मिळाला होता. झोमॅटो कंपनीचा अन्न वितरण विभाग Q2FY23 मध्ये समायोजित EBITDA वर ब्रेक झाला आहे. तर झोमॅटो कंपनी Q4FY23 मध्ये एक्स-क्विक कॉमर्स समायोजित EBITDA वर ब्रेकआऊट देत आहे.

Disclaimer | म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Zomato Share Price today on 09 June 2023.

हॅशटॅग्स

#Zomato Share Price(70)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x