27 July 2024 11:41 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांच्या खात्यात दर महिना रु.20,050 येतील, महिना खर्चाची चिंता मिटेल Post Office Scheme | सरकारी योजनेत फायदाच फायदा! 95 रुपयांच्या बचतीवर मिळतील 14 लाख रुपये, संधी सोडू नका Reliance Power Share Price | कर्जमुक्त कंपनी रिलायन्स पॉवरचा शेअर 'पॉवर' दाखवणार, 29 रुपयांचा शेअर खरेदीला गर्दी Smart Investment | पैशाने पैसा बनवतो हा फॉर्म्युला, वयाच्या 40 आधीच स्वतःचा आलिशान फ्लॅट खरेदी करू शकाल OTT Most Watch Film | OTT वर सर्वाधिक पाहिले जात आहेत हे हिंदी चित्रपट, थ्रिलर सिनेमा टॉप ट्रेंडमध्ये Upcoming Movies | 15 ऑगस्टला बॉक्स ऑफिस धमाका; या चार सिनेमांची चित्रपटगृहात होणारं थेट भेट Bonus Share News | कमाईची संधी सोडू नका! ही कंपनी फ्री शेअर्स देणार, शॉर्ट टर्म मध्ये पैसा वाढवा
x

Gold Price Today | सोनं खरेदीच्या तयारीत? आज सोन्याचे दर किती झाले पहा, तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या

Highlights:

  • Gold Price Today
  • दिवाळीत सोन्या-चांदीच्या दरात वाढ
  • आज सराफा बाजारात सोन्याचा दर किती
  • एमसीएक्सवर सोन्या-चांदीच्या दरात वाढ
Gold Price Today

Gold Price Today | मे महिन्यात विक्रमी पातळीवर पोहोचलेल्या सोन्या-चांदीत गेल्या काही दिवसांपासून चढ-उतारांचा काळ सुरू आहे. 5 मे रोजी सोन्या-चांदीने विक्रमी उच्चांक गाठत विक्रम केला होता. त्या दिवशी सोनं 61739 रुपये आणि चांदी 77280 रुपये प्रति किलोग्राम वर पोहोचली होती. आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी सोने आणि चांदी या दोन्हीमध्ये तेजी दिसून येत आहे. चांदीमध्ये आज प्रचंड वाढ झाली आहे.

दिवाळीत सोन्या-चांदीच्या दरात वाढ

एक दिवसापूर्वीच्या किंमतीवर नजर टाकली तर सोन्यात २२०० रुपयांची तर चांदीमध्ये विक्रमी पातळीवरून ५५०० रुपयांनी घसरण झाली होती. शुक्रवारी मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (एमसीएक्स) सोने-चांदीच्या दरात किंचित वाढ दिसून आली. तर सराफा बाजारात चांगली तेजी दिसून येत आहे. मात्र, या अस्थिरतेच्या काळातही सोने-चांदीआणखी वाढेल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. दिवाळीनिमित्त सोनं 65,000 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 80,000 रुपये प्रति किलोपर्यंत जाऊ शकते.

आज सराफा बाजारात सोन्याचा दर किती

सराफा बाजारच्या वेबसाईटवर जारी करण्यात आलेल्या https://ibjarates.com नोटिफिकेशननुसार शुक्रवारी सोने 240 रुपयांनी वाढून 59,960 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले आहे. दुसरीकडे चांदी 73559 रुपये प्रति किलोग्राम वर पोहोचली आहे. चांदीच्या दरात आज प्रतिकिलो १५०० रुपयांनी वाढ झाली. हा या महिन्यातील सर्वात मोठा फायदा आहे. याआधी गुरुवारी सोने 59587 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 73559 रुपये प्रति किलो वर बंद झाली होती.

एमसीएक्सवर सोन्या-चांदीच्या दरात वाढ

मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर (एमसीएक्स) शुक्रवारी सोने आणि चांदीच्या दरात किंचित वाढ पाहायला मिळत आहे. एमसीएक्सवर सोने 2 रुपयांनी वाढून 59893 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 293 रुपयांनी वाढून 73963 रुपये प्रति किलो झाली. याआधी गुरुवारी एमसीएक्सवर सोने 59891 रुपये आणि चांदी 73670 रुपये प्रति किलोवर बंद झाली होती.

Disclaimer | म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News : Gold Price Today Updates check details on 09 June 2023.

हॅशटॅग्स

#Gold Price Today(249)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x