
Tata Group Shares | टाटा समूहाचा भाग असलेल्या ट्रेंट लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना मजबूत कमाई करून दिली आहे. मागील 10 महिन्यांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना दुप्पट नफा कमावून दिला आहे. 27 जानेवारी 2023 रोजी टाटा ग्रुपच्या ट्रेंट कंपनीचे शेअर्स 1176.70 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 8 नोव्हेंबर 2023 रोजी ट्रेंट कंपनीचे शेअर्स 2446.30 रुपये किमतीवर पोहोचले होते. Trent Share Price
मागील 10 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 108 टक्के परतावा कमावून दिला आहे. शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार राधाकिशन दमाणी यांनी देखील ट्रेंट स्टॉकवर मोठी बाजी लावली आहे. ट्रेंट कंपनीचे शेअर्स कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 2504.95 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज गुरूवार दिनांक 9 नोव्हेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.97 टक्के वाढीसह 2,476.55 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
टाटा समुहाचा भाग असलेली ट्रेंट ही एक रिटेल कंपनी आहे, जी रिटेल फॅशन चेन वेस्टसाइड चे संचालन करते. दमाणी यांनी ट्रेंट कंपनीचे एकूण 54 लाख शेअर्स होल्ड केले आहेत. म्हणजेच त्यांनी जवळपास कंपनीचे 1.52 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. राधाकिशन दमानी यांच्या ट्रेंट कंपनीमधील शेअर्सची मूल्य 1330 कोटी रुपये आहे. दमाणी यांनी ट्रेंट लिमिटेड कंपनीमध्ये आपल्या डेरिव्ह ट्रेडिंग अँड रिसॉर्ट्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमार्फत गुंतवणूक केली आहे.
मागील 5 वर्षात ट्रेंट कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 647 टक्के परतावा कमावून दिला आहे. 9 नोव्हेंबर 2018 रोजी या कंपनीचे शेअर्स 327.50 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 8 नोव्हेंबर 2023 रोजी हा स्टॉक 2446.30 रुपये किमतीवर क्लोज झाला होता.
मागील 10 वर्षात ट्रेंट लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 2555 टक्के परतावा कमावून दिला आहे. 8 नोव्हेंबर 2013 रोजी या कंपनीचे शेअर्स 92.09 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आता हा स्टॉक 2446.30 रुपये किमतीवर पोहोचला आहे.
चालू आर्थिक वर्षाच्या सप्टेंबर तिमाहीत या कंपनीने 289.6 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत कंपनीच्या नफ्यात 55.9 टक्के वाढ झाली आहे. मागील वर्षीच्या सप्टेंबर 2023 तिमाहीत या कंपनीने 186 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. जुलै-सप्टेंबर 2023 या तिमाहीत ट्रेंट कंपनीने 2891 कोटी रुपये महसुल संकलित केला होता. तर मागील वर्षी सप्टेंबर तिमाहीत कंपनीने 1841 कोटी रुपये महसूल संकलित केला होता.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.