 
						Tata Investment Share Price | टाटा समूहाचा भाग आलेल्या टाटा इन्व्हेस्टमेंट कंपनीच्या शेअर्समध्ये अफाट तेजी पाहायला मिळत आहे. या कंपनीचे शेअर्स मागील काही दिवसांपासून सतत अप्पर सर्किट हीट करत आहेत. मागील 15 दिवसात टाटा इन्व्हेस्टमेंट कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 60 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. आज देखील या कंपनीचे शेअर 5 टक्के अप्पर सर्किटमध्ये अडकले आहेत.
सध्या टाटा इन्व्हेस्टमेंट कंपनीचे शेअर्स आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत आहेत. आज मंगळवार दिनांक 5 मार्च 2024 रोजी टाटा इन्व्हेस्टमेंट कंपनीचे शेअर्स 5.00 टक्के वाढीसह 8,849.80 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये टाटा इन्व्हेस्टमेंट कंपनीचे शेअर्स 8377 रुपये किमतीवर ओपन झाले होते. तर दिवसा अखेर हा स्टॉक 8428.40 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 1730 रुपये होती. म्हणेजच टाटा इन्व्हेस्टमेंट कंपनीचे शेअर्स आपल्या नीचांक किंमत पातळीवरून 5 पट अधिक वाढले आहेत.
मागील पाच दिवसांत टाटा इन्व्हेस्टमेंट कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 18 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 52 टक्क्यांपेक्षा जास्त वाढली आहे. तर मागील सहा महिन्यांत टाटा इन्व्हेस्टमेंट कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 242 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील दोन महिन्यांत टाटा इन्व्हेस्टमेंट कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे अक्षरशः दुप्पट केले आहेत. या काळात शेअर्सची किंमत तब्बल 97.91 टक्के वाढली आहे.
जर तुम्ही एका वर्षभरापूर्वी टाटा इन्व्हेस्टमेंट कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते, तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 4.15 लाख रुपये झाले असते. या काळात शेअर्स 2072 रुपयेवरून वाढून 8428.40 रुपये किमतीवर पोहोचले आहेत. टाटा इन्व्हेस्टमेंट कंपनीच्या शेअर्सने मागील 25 वर्षांत आपल्या गुंतवणुकदारांना 11498 टक्के परतावा कमावून दिला आहे. 6 जानेवारी 1999 रोजी टाटा इन्व्हेस्टमेंट कंपनीचे शेअर्स 72.67 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील पाच वर्षांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 905 टक्के परतावा कमावून दिला आहे.
टाटा इन्व्हेस्टमेंट कंपनीच्या प्रवर्तकांनी कंपनीचे 73.38 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. मागील एका वर्षभरात यात कोणताही बदल झालेला नाही. 31 मार्च 2023 पर्यंत परकीय संस्थागत गुंतवणूकदारांनी त्यांचा वाटा 1.02 टक्क्यांवरून वाढवून 1.20 टक्केवर नेला आहे. तर देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी टाटा इन्व्हेस्टमेंट कंपनीमधील आपले भाग भांडवल 0.42 टक्क्यांवरून वाढवून 0.44 टक्के केले आहे. सार्वजनिक गुंतवणूकदारांनी टाटा इन्व्हेस्टमेंट कंपनीचे 24.98 टक्के भाग भांडवल धारण केले आहेत.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		