
Tata Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीचे शेअर्स गुरूवारी 1.7 टक्के वाढीसह 978.90 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज देखील या कंपनीचे (NSE: TATAMOTORS) शेअर्स किंचित वाढीसह व्यवहार करत आहेत. ब्रोकरेज फर्म एमके ग्लोबलने टाटा मोटर्स कंपनीच्या शेअरची रेटिंग अपग्रेड केली आहे. एमके ग्लोबल फायनान्शियल सर्व्हिसेस फर्मच्या तज्ञांनी टाटा मोटर्स स्टॉकवर BUY रेटिंग देऊन गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. (टाटा मोटर्स कंपनी अंश)
शेअरची टारगेट प्राईस
तज्ञांनी या शेअरची टारगेट प्राईस 1175 रुपये निश्चित केली आहे. मागील एक महिन्यापासून टाटा मोटर्स कंपनीचे शेअर विक्रीच्या दबावात व्यवहार करत होते. या काळात कंपनीचे शेअर्स 18 टक्क्यांनी घसरले आहेत. आज शुक्रवार दिनांक 20 सप्टेंबर 2024 रोजी टाटा मोटर्स कंपनीचे शेअर्स 0.38 टक्के वाढीसह 970.70 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
देशांतर्गत व्यावसायिक वाहने आणि प्रवासी वाहने यांची विक्री मंदावल्याने टाटा मोटर्स कंपनीच्या शेअरमध्ये घसरण पाहायला मिळत आहे. भारतीय बाजारपेठेत टाटा मोटर्स कंपनीच्या व्यावसायिक वाहनांचा खप सुधारत आहे. अनेक ब्रोकरेज फर्मने टाटा मोटर्स कंपनीची विक्री आर्थिक वर्ष 2024-27 मध्ये 6 टक्केपेक्षा जास्त वाढू शकते.
टाटा मोटर्स शेअरचा परतावा
मागील एका महिन्यात टाटा मोटर्स कंपनीच्या शेअरची किंमत 11 टक्क्यांनी घसरली आहे. YTD आधारे टाटा मोटर्स कंपनीचे शेअर्स 23 टक्के वाढले आहेत. मागील एका वर्षात टाटा मोटर्स कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 50 टक्केपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्याची उच्चांक किंमत पातळी 1,179.05 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 608.45 रुपये होती. कंपनीचे एकूण बाजार भांडवल 3,54,579.57 कोटी रुपये आहे.
Latest Marathi News | Tata Motors Share Price 20 September 2024 Marathi News.
Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.