
Tata Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीच्या शेअर्समध्ये आज किंचित नफा वसुली पाहायला मिळत आहे. मंगळवारी टाटा मोटर्स लिमिटेड डीव्हीआर कंपनीचा शेअर 4.73 टक्क्यांच्या वाढीसह 804.60 रुपये या आपल्या विक्रमी उच्चांक किमतीवर पोहोचला होता. तर टाटा मोटर्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 4.91 टक्क्यांच्या वाढीसह 1,179.05 रुपये किमतीवर पोहोचले होते. ( टाटा मोटर्स कंपनी अंश )
टाटा मोटर्स DVR म्हणजेच डिफरेंशियल व्होटिंग राइट या कंपनीच्या शेअर्समध्ये मंगळवारी निर्माण झालेली तेजी ब्लॉक डीलमुळे पाहायला मिळाली होती. या दिवशी एकूण 10.36 कोटी रुपये मूल्याचे 1,34,765 शेअर्स 768.45 रुपये किमतीवर ट्रेड झाले होते. आज गुरूवार दिनांक 1 ऑगस्ट 2024 रोजी टाटा मोटर्स स्टॉक 0.66 टाकेल घसरणीसह 1,149 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
शेअर बाजारातील तज्ञांनी टाटा मोटर्स स्टॉकवर ‘बाय ऑन डिप’ चा सल्ला दिला आहे. टाटा मोटर्स कंपनीने इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रात आपली मजबूत उपस्थिती निर्माण केली आहे. एंजल वन फर्मच्या तज्ञांच्या मते, टाटा मोटर्स स्टॉकसाठी 1,100 रुपये किंमत पातळी इंटरमीडिएट कुशनिंग म्हणून काम करत आहे. या स्टॉकने 1,050-1,040 रुपये ब्रेकआउट लेव्हलच्या जवळ मजबूत सपोर्ट निर्माण केला आहे.
मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअर्समध्ये 18 टक्क्यांपेक्षा जास्त वाढ पाहायला मिळाली आहे. मागील आठवड्यात टाटा मोटर्स कंपनीच्या शेअर्सने पाच महिन्यांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर लक्षणीय ब्रेकआउट दिला होता. सध्याची परिस्थिती पाहता या स्टॉकमध्ये कोणत्याही किरकोळ पातळीवर पुलबॅक पाहायला मिळू शकतो, आणि गुंतवणुकीची सुवर्ण संधी निर्माण होऊ शकते.
आनंद राठी शेअर्स अँड स्टॉक ब्रोकर्स फर्मच्या तज्ञांच्या मते, टाटा मोटर्स स्टॉकने 1,060 रुपये किमतीवर मजबूत सपोर्ट निर्माण केला आहे. या स्टॉकला 1,200 रुपये किमतीवर मजबूत प्रतिकार मिळत आहे. टाटा मोटर्स स्टॉकचा RSI सध्या 71 अंकावर आहे. म्हणजेच हा स्टॉक ओव्हरबॉट झोनमध्ये पोहचला आहे. रेलिगेअर ब्रोकिंग फर्मच्या तज्ञांच्या मते, टाटा मोटर्स पुढील काळात 1,250 रुपये किमतीवर जाऊ शकतो. गुंतवणूकदारांनी या स्टॉकवर 1,150 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावावा.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.