1 May 2024 12:08 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 01 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 01 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या PSU Stocks | या PSU शेअरने अल्पावधीत दिला 200% परतावा! कंपनीबाबत सकारात्मक अपडेटने शेअर्स खरेदीसाठी गर्दी Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी हे टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, झटपट 22 टक्केपर्यंत परतावा मिळेल REC Share Price | कमाईची संधी! 1 वर्षात 265% परतावा देणारा शेअर काही दिवसात देईल मोठा परतावा BHEL Share Price | मल्टिबॅगर PSU BHEL शेअरला 'या' प्राईसवर मजबूत सपोर्ट, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर NBCC Share Price | सरकारी कंपनीचा शेअर मालामाल करतोय, 1 वर्षात दिला 265% परतावा, स्टॉक चार्ट काय संकेत देतोय?
x

Adani Green Share Price | अल्पावधीत 230% परतावा देणारा अदानी ग्रीन एनर्जी शेअर तेजीत येणार, फायद्याची अपडेट आली

Adani Green Share Price

Adani Green Share Price | अदानी समूहाचा भाग असलेल्या भारतातील सर्वात मोठ्या अक्षय ऊर्जा निर्मिती करणाऱ्या अदानी ग्रीन एनर्जी कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत खरेदी पाहायला मिळत आहे. या कंपनीची उपकंपनी असलेल्या अदानी ग्रीन एनर्जी ट्वेंटी फोर बी या कंपनीने खवरा, गुजरातमध्ये 447.95 मेगावॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प उभारला आहे. ( अदानी ग्रीन एनर्जी कंपनी अंश )

कंपनीने 14 फेब्रुवारी 2024 रोजी सेबीला दिलेल्या माहितीत कळवले आहे की त्यांनी खवरा येथे एकूण 1,000 मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित केले आहे. ही बातमी येताच अदानी ग्रीन एनर्जी स्टॉक कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 2 टक्के वाढीसह 1969.75 रुपये किमतीवर पोहचला होता. आज गुरूवार दिनांक 7 मार्च 2024 रोजी अदानी ग्रीन एनर्जी स्टॉक 0.55 टक्के वाढीसह 1,921 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

अदानी ग्रीन एनर्जी ट्वेंटी फोर ए लिमिटेड आणि अदानी ग्रीन एनर्जी ट्वेंटी फोर बी लिमिटेड या दोन्ही कंपन्या अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेडच्या उपकंपन्या आहेत. यांनी गुजरातमधील खवरा याठिकाणी 448.95 मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प उभारले आहे. हे संयंत्र कार्यान्वित झाल्यामुळे अदानी ग्रीन एनर्जी कंपनीची एकूण नूतनीकरणक्षम वीज निर्मिती क्षमता 9,478 मेगावॅटवर पोहोचली आहे.

या कंपनीने 2030 पर्यंत भारतात 45,000 मेगावॅट वीज निर्मिती क्षमता साध्य करण्याचे लक्ष्य निर्धारित केले आहे. 14 फेब्रुवारी 2024 रोजी सेबीला दिलेल्या माहितीत अदानी ग्रीन एनर्जी कंपनीने कळवले आहे की, त्यांची अदानी ग्रीन एनर्जी ट्वेंटी फोर ए आणि अदानी ग्रीन एनर्जी ट्वेंटी फोर बी या दोन्ही युनिट्सनी खवरामध्ये 551 मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प सुरू केले आहे.

मागील सहा महिन्यांत अदानी ग्रीन एनर्जी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 90 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 230 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील वर्षी अदानी ग्रीन एनर्जी स्टॉकची किंमत 589 रुपये या नीचांक किमतीवर पोहोचली होती. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 2,016 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 590.10 रुपये होती. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 3,08,403.20 कोटी रुपये आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Adani Green Share Price NSE Live 07 March 2024.

हॅशटॅग्स

#Adani Green Share Price(23)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x