
Tata Motors Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा मोटर्स लिमिटेड कंपनीबाबत एक महत्त्वाची अपडेट आली आहे. टाटा मोटर्स लिमिटेड कंपनीला कर कमी भरल्यामुळे आणि जास्त क्रेडिट घेतल्याने दंड आणि व्याजापोटी 25 कोटी रुपये कर मागणीची नोटीस धाडण्यात आली आहे. त्यामुळे टाटा मोटर्स स्टॉकमध्ये आज घसरण पहायला मिळत आहे. आज शुक्रवार दिनांक 3 मे 2024 रोजी टाटा मोटर्स स्टॉक 1.27 टक्के घसरणीसह 1,014.75 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. ( टाटा मोटर्स लिमिटेड कंपनी अंश )
टाटा मोटर्स कंपनीने स्टॉक एक्स्चेंजला माहिती दिली की, 30 एप्रिल 2024 रोजी दिल्लीस्थित GST अधिकारी यांच्यामार्फत टाटा मोटर्स कंपनीला नोटीस देण्यात आली आहे. या नोटीसमध्ये CGST/SGST कायदा 2017 च्या कलम 73 अंतर्गत कराचा कमी भरणा आणि अतिरिक्त क्रेडिटमुळे टॅक्सची मागणी करण्यात आली आहे. थकीत टॅक्सची एकूण रक्कम 14,25,68,173 रुपये असून त्यावर 9,14,15,704 रुपये व्याज आकारण्यात आले आहे. आणि ही एकूण रक्कम 1,42,56,815 रुपये झाली आहे.
टाटा मोटर्स कंपनीने सेबीला माहिती दिली आहे की, कंपनी या नोटीसबाबत कंपनी कायदेशीर विचार करत आहे. आणि याविरोधात अपील दाखल करण्याचा देखील विचार केला जात आहे. हा नोटीसमुळे टाटा मोटर्स कंपनीच्या आर्थिक आणि परिचालन व्यवसायावर कोणताही नकारात्मक परिणाम होणार नाही.
30 एप्रिल रोजी टाटा मोटर्स कंपनीचे शेअर्स 7.40 रुपये वाढीसह 1008 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 1065.60 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 474.55 रुपये होती. मागील एका वर्षात टाटा मोटर्स स्टॉकने आपल्या गुंतवणुकदारांना 109 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका महिन्यात टाटा मोटर्स स्टॉक 0.33 टक्के वाढला आहे. मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 58 टक्के वाढवले आहेत. 2024 या वर्षीच्या जानेवारीपासून आतपर्यंत टाटा मोटर्स स्टॉक 27 टक्के वाढला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.