
Tata Motors Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा मोटर्स कंपनीच्या शेअर्समध्ये विक्रीचा दबाव निर्माण झाला आहे. नुकताच टाटा मोटर्स कंपनीने तामिळनाडू राज्यात मोठी गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. टाटा मोटर्स कंपनी तमिळनाडूमध्ये वाहन निर्मिती केंद्र उभारणार आहे. ( टाटा मोटर्स कंपनी अंश )
बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये टाटा मोटर्स कंपनीचे शेअर्स 4 टक्क्यांच्या घसरणीसह क्लोज झाले होते. आज शुक्रवार दिनांक 15 मार्च 2024 रोजी टाटा मोटर्स स्टॉक 2.23 टक्के घसरणीसह 946.20 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
टाटा मोटर्स कंपनीने सेबीला माहिती दिली की, कंपनीने तमिळनाडू राज्यात वाहन निर्मिती सुविधा केंद्र उभारण्यासाठी तमिळनाडू राज्य सरकारसोबत सामंजस्य करार केला आहे. या MOU नुसार टाटा मोटर्स कंपनी तमिळनाडू राज्यात 9000 कोटी रुपये गुंतवणूक करणार आहे. पुढील 5 वर्षांत ही गुंतवणूक करणे अपेक्षित आहे. या गुंतवणुकीमुळे राज्यात 5000 लोकांना रोजगार दिला जाईल.
टाटा मोटर्स कंपनीच्या आधी व्हिएतनाममधील इलेक्ट्रिक वाहन उत्पादक कंपनी विनफास्टने देखील तमिळनाडूमध्ये कारखाना उभारणीचे काम सुरू केले आहे. अवघ्या दोन महिन्यांत वाहन क्षेत्रातील दोन दिग्गज कंपन्यांनी आपले प्लांट उभारण्यासाठी तमिळनाडू राज्याची निवड केली आहे.
बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये टाटा मोटर्स कंपनीचे शेअर्स 4.28 टक्क्यांच्या घसरणीसह ट्रेड करत होते. टाटा मोटर्स स्टॉक मध्यम ते दीर्घ मुदतीत गुंतवणूकदारांना मजबूत फायदा देऊ शकतो. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 130 टक्के परतावा कमावून दिला आहे.
मागील 3 वर्षात या कंपनीचे शेअर्स तब्बल 206 टक्के वाढले आहेत. तर मागील 3 महिन्यांत टाटा मोटर्स कंपनीच्या गुंतवणूकदारांनी 35 टक्के नफा कमावला आहे. शेअरखान फर्मने देखील टाटा मोटर्स स्टॉकवर 1188 रुपये टार्गेट प्राइस जाहीर करून गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.