
Tata Motors Share Price | शेअर बाजारातील अनेक तज्ञ टाटा मोटर्स कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याबाबत सकारात्मक आहेत. ज्या लोकांकडे टाटा मोटर्स कंपनीचे शेअर्स आहेत, त्यांना तज्ञांनी स्टॉक होल्ड करण्याचा सल्ला दिला आहे.
मागील काही महिन्यात टाटा मोटर्स कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळाली आहे. या वाहन निर्मात्या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे अनेक पट वाढवले आहे. शुक्रवार दिनांक 16 फेब्रुवारी 2024 रोजी टाटा मोटर्स स्टॉक 1.94 टक्के वाढीसह 938.40 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे.
शेअर बाजारातील तज्ञांच्या मते, टाटा मोटर्स कंपनीचे शेअर्स पुढील काळात 1500 रुपये ते 2000 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. यासाठी गुंतवणुकदारांना 1-2 वर्ष स्टॉक होल्ड करावा लागेल. टाटा मोटर्स कंपनीचे शेअर्स भारतातील सर्वोत्तम ऑटो स्टॉक म्हणून ओळखले जातात.
टाटा मोटर्स कंपनी वाहन क्षेत्रात सर्व बाबतीत अग्रणी मानली जाते. भारतीय देशांतर्गत वाहन बाजारात टाटा मोटर्स कंपनीचा पोर्टफोलिओ खूप मोठा आणि वैविध्यपूर्ण आहे. जग्वार आणि लँडरोव्हर यासारख्या आलिशान गाड्या टाटा मोटर्स कंपनीचा भाग आहे.
टाटा मोटर्स कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये प्रवासी वाहने, कार, इलेक्ट्रिक वाहने, असा भलामोठा पसारा आहे. टाटा मोटर्स कंपनीने नुकताच आपली इलेक्ट्रिक वाहने भारतीय बाजारात लाँच केले आहे. यासह काही वाहनांचे दर देखील कमी केले आहे.
याशिवाय टाटा मोटर्स कंपनीच्या डिझेल आणि सीएनजी व्हेरियंटला भारत मोठ्या प्रमाणात मागणी आहे. 16 फेब्रुवारी 2024 रोजी टाटा मोटर्स कंपनीचे शेअर्स 2.5 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होते. भविष्यात या कंपनीचे शेअर्स गुंतवणुकदारांना श्रीमंत करतील यात शंका नाही.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.