16 June 2024 11:10 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HAL Share Price | HAL स्टॉक चार्टवर मजबूत तेजीचे संकेत, कमाईची मोठी संधी सोडू नका Adani Port Share Price | मल्टिबॅगर अदानी पोर्ट्स शेअरची रेटिंग अपग्रेड, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार BCL Industries Share Price | शेअर प्राईस ₹57, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, शॉर्ट टर्ममध्ये ₹95 वर पोहोचणार SBI Mutual Fund | SBI योजनेत महीना रु.5000 बचत, मुलांच्या शिक्षण ते लग्नकार्यावेळी 55 लाख रुपये मिळतील My EPF Money | पगारदारांनो! सॅलरीतून EPF कापला जातो? पहिलं स्कीम सर्टिफिकेट मिळवा, अन्यथा पेन्शन विसरा Numerology Horoscope | 16 जून 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा रविवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 16 जून 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या
x

Tata Motors Share Price | टाटा ग्रुपचे 5 शेअर्स मालामाल करत आहेत, मिळतोय 1647 टक्केपर्यंत परतावा

Tata Motors Share Price

Tata Motors Share Price | टाटा समूहाचा भाग आलेल्या पाच दिग्गज कंपन्यांनी मार्च 2024 ला संपलेल्या तिमाहीत जबरदस्त कामगिरी केली आहे. आज या लेखात आपण याच टॉप पाच कंपन्याबाबत सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. टाटा समूहाच्या कंपन्यानी नेहमी आपल्या गुंतवणुकदारांना भरघोस कमाई करून दिली आहे. हे शेअर्स दीर्घकाळात गुंतवणुकदारांना अक्षरशः करोडपती करत असतात.

म्हणून गुंतवणूकदारांचा देखील टाटा समूहातील शेअर्सवर मजबूत विश्वास असतो. या कंपन्या प्रत्येक तिमाहीत जबरदस्त कामगिरी करत असतात. अनेक तज्ञ आणि गुंतवणूकदार देखील टाटा समूहाच्या निकालांची वाट पाहत असतात. चला तर मग जाणून घेऊ टाटा समूहाच्या 5 कंपन्यांची माहिती.

ट्रेंट लिमिटेड :
मार्च 2024 ला संपलेल्या तिमाहीत या कंपनीच्या निव्वळ नफ्यात मागील वर्षीच्या याच तिमाहीच्या तुलनेत 1647 टक्के वाढ झाली होती. वार्षिक आधारावर या कंपनीच्या विक्रीत 51 टक्के वाढ झाली होती. आज गुरूवार दिनांक 23 मे 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1 टक्के वाढीसह 4,695.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

टाटा मोटर्स :
मार्च 2024 ला संपलेल्या तिमाहीत या कंपनीच्या निव्वळ नफ्यात मागील वर्षीच्या याच तिमाहीच्या तुलनेत 220 टक्के वाढ झाली होती. वार्षिक आधारावर या कंपनीच्या विक्रीत 14 टक्के वाढ झाली होती. आज गुरूवार दिनांक 23 मे 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.55 टक्के वाढीसह 962.20 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

ऑटोमोटिव्ह स्टॅम्पिंग अँड असेंब्ली :
मार्च 2024 ला संपलेल्या तिमाहीत या कंपनीच्या निव्वळ नफ्यात मागील वर्षीच्या याच तिमाहीच्या तुलनेत 126 टक्के वाढ झाली होती. वार्षिक आधारावर या कंपनीच्या विक्रीत 8 टक्के वाढ झाली होती. आज गुरूवार दिनांक 23 मे 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1 टक्के घसरणीसह 834 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

बनारस हॉटेल्स :
मार्च 2024 ला संपलेल्या तिमाहीत या कंपनीच्या निव्वळ नफ्यात मागील वर्षीच्या याच तिमाहीच्या तुलनेत 53 टक्के वाढ झाली होती. वार्षिक आधारावर या कंपनीच्या विक्रीत 8 टक्के वाढ झाली होती. आज गुरूवार दिनांक 23 मे 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.25 टक्के घसरणीसह 8853 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

ऑटोमोबाइल कॉर्प ऑफ गोवा लिमिटेड :
मार्च 2024 ला संपलेल्या तिमाहीत या कंपनीच्या निव्वळ नफ्यात मागील वर्षीच्या याच तिमाहीच्या तुलनेत 41 टक्के वाढ झाली होती. वार्षिक आधारावर या कंपनीच्या विक्रीत 25 टक्के वाढ झाली होती. आज गुरूवार दिनांक 23 मे 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.28 टक्के घसरणीसह 1,905 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Tata Motors Share Price NSE Live 23 May 2024.

हॅशटॅग्स

#Tata Motors Share Price(97)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x