16 June 2024 1:47 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Credit Card Limit | क्रेडिट कार्ड वापरताना करू नका या 5 चुका, अचानक क्रेडिट कार्ड लिमिट कमी होईल Property Knowledge | भावांनो! तुमची बहीण विवाहित असो वा अविवाहित, वडिलोपार्जित मालमत्तेत असतो 'इतका' हक्क HAL Share Price | HAL स्टॉक चार्टवर मजबूत तेजीचे संकेत, कमाईची मोठी संधी सोडू नका Adani Port Share Price | मल्टिबॅगर अदानी पोर्ट्स शेअरची रेटिंग अपग्रेड, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार BCL Industries Share Price | शेअर प्राईस ₹57, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, शॉर्ट टर्ममध्ये ₹95 वर पोहोचणार SBI Mutual Fund | SBI योजनेत महीना रु.5000 बचत, मुलांच्या शिक्षण ते लग्नकार्यावेळी 55 लाख रुपये मिळतील My EPF Money | पगारदारांनो! सॅलरीतून EPF कापला जातो? पहिलं स्कीम सर्टिफिकेट मिळवा, अन्यथा पेन्शन विसरा
x

RVNL Share Price | RVNL स्टॉक बुलेट तेजीने परतावा देणार, स्टॉक चार्टनुसार 'या' प्राईसवर मजबूत सपोर्ट, खरेदीचा सल्ला

RVNL Share Price

RVNL Share Price | आरव्हीएनएल कंपनीचे शेअर्स आज तुफान तेजीत वाढत आहेत. कालच्या ट्रेडिंग सेशनमधे या कंपनीचे शेअर्स 5.06 टक्क्यांच्या वाढीसह 359 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. नुकताच आरव्हीएनएल कंपनीला दक्षिण पूर्व रेल्वे विभागाने 148.27 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर दिली आहे. ( आरव्हीएनएल कंपनी अंश )

आरव्हीएनएल कंपनीचा निव्वळ नफा मार्च तिमाहीत वर्ष-दर-वर्ष आधारावर 33.2 टक्क्यांनी वाढून 478.6 कोटी रुपये नोंदवला आहे. मार्च तिमाहीत आरव्हीएनएल कंपनीने 17.4 टक्के वाढीसह 6,714 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे. आज गुरूवार दिनांक 23 मे 2024 रोजी आरव्हीएनएल स्टॉक 8.00 टक्के वाढीसह 368.70 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.

आरव्हीएनएल स्टॉकच्या टेक्निकल चार्टवर 338 रुपये किमतीवर मजबूत सपोर्ट पाहायला मिळत आहे. जर हा स्टॉक सपोर्ट किमतीच्या खाली आला तर शेअर 330 रुपये आणि नंतर 322 रुपये किमतीवर जाऊ शकतो. प्रभुदास लिल्लाधर फर्मच्या तज्ञांच्या मते, आरव्हीएनएल स्टॉकमध्ये 250 रुपयेवरून मजबूत तेजी आली होती. तज्ञांच्या मते हा स्टॉक जर 345 रुपये किमतीच्या पार गेला तर शेअरमध्ये मजबूत तेजी पाहायला मिळू शकते.

आनंद राठी शेअर्स अँड स्टॉक ब्रोकर्स फर्मच्या तज्ञांच्या मते, आरव्हीएनएल स्टॉकमध्ये 330 रुपये किमतीवर मजबूत सपोर्ट पाहायला मिळत आहे. आणि 360 रुपये किमतीवर प्रतिरोध पाहायला मिळत आहे. तज्ञांच्या मते, पुढील एका महिन्यासाठी या स्टॉकची अपेक्षित ट्रेडिंग रेंज 310 रुपये ते 400 रुपये दरम्यान असेल.

Tips2trades फर्मच्या तज्ञांच्या मते, आरव्हीएनएल स्टॉकमध्ये 366 रुपये किमतीवर रेझिस्टन्स पाहायला मिळत आहे. आणि 322 रुपये किमतीवर मजबूत सपोर्ट पाहायला मिळत आहे. जर हा स्टॉक सपोर्ट लेव्हलच्या खाली आला तर, शेअर 252 रुपये किमतीवर जाऊ शकतो.

आरव्हीएनएल ही कंपनी भारतीय रेल्वेची शाखा आहे. ही कंपनी रेल्वे मंत्रालयाच्या अंतर्गत व्यवसाय करते. ही कंपनी रेल्वे संबधित डिझाइनचे टप्पे, अंदाज तयार करणे, करारनामा करणे, यासारख्या सेवा प्रदान करण्याचा व्यवसाय करते. मार्च 2024 च्या तिमाहीतील शेअरहोल्डिंग डेटानुसार आरव्हीएनएल कंपनीत भारत सरकारचा वाटा 72.84 टक्के होता.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | RVNL Share Price NSE Live 23 May 2024.

हॅशटॅग्स

RVNL Share Price(71)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x